Cricket / ज्याने चेंडू मारला, त्यानेच आणावा : सरावादरम्यान झाडांत हरवला चेंडू, धोनी- शास्त्रींनी शोधून आणावा

लहानपणी गल्लीत खेळताना जो बॅटिंग करत असेल तोच हरवलेला चेंडू आणत असे, त्या दिवसांची यावरून आठवण झाली

दिव्य मराठी नेटवर्क

Jun 30,2019 11:34:38 AM IST

हे छायाचित्र बर्मिंगहममध्ये झालेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सरावाचे आहे. संघ शनिवारी तेथे आजच्या भारत-इंग्लंड सामन्याआधी सराव करण्यासाठी मैदानावर आला होता. त्या वेळी चेंडू झाडांत हरवला. सामान्यपणे सराव करत असलेले सहकारीच चेंडू आणून देतात, पण येथे धोनी स्वत: बॅटिंग पॅडमध्ये चेंडू शोधताना दिसला. त्याच्यासोबत प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्रीही चेंडू शोधत होते. लहानपणी गल्लीत खेळताना जो बॅटिंग करत असेल तोच हरवलेला चेंडू आणत असे. त्या दिवसांची यावरून आठवण झाली.

X
COMMENT