आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी स्वत: नाव मागे घेण्याची शक्यता; व्यवस्थापनाचे पंतच्या कामगिरीवर लक्ष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संघाचा तीन ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौरा सुरू होत आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीतील पराभवानंतर संघाचा हा पहिला दौरा असेल, जेथे ३ वनडे, ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळतील. वनडे आणि टी-२० मालिकेसाठी शनिवारी भारतीय संघाची निवड होईल. विश्वचषकानंतर संघासह स्पोर्ट स्टाफ आणि निवड समितीचे समीकरणे वेगाने बदलली आहेत. खेळाडूंच्या निवृत्तीपासून कर्णधार बदलण्याची मागणी होतेय. तरी देखील बीसीसीआय एकदम मोठा बदल करण्यास उत्सुक नाही, कारण संघाने सलग चांगले प्रदर्शन केले आणि केवळ एकच सामना गमावला. त्यामुळे मोठे पाऊल उचलणे योग्य ठरणार नाही. 


विराट कोहलीचे कर्णधारपद सध्या तरी धोक्यात नाही. कोहली  व रोहित शर्मा विश्रांती देखील घेणार नाहीत. दोघे या दौऱ्यावर जातील. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनी विश्रांतीच्या नावावर या दौऱ्यातून आपले नाव मागे घेऊ शकतो. संघ व्यवस्थापक आता ऋषभ पंतच्या प्रदर्शन सुधारणेवर विशेष लक्ष देईल. जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. नवदीप सैनी, खलील अहमद संघात दिसू शकतात. एकूणच निवड समितीचे ३ गोष्टीवर लक्ष असेल. पहिली - विराटचे कर्णधारपद राहिली की जाईल. दुसरी - धोनीचे काय करायचे. तिसरी - मधली फळी मजबूत करण्यासाठी नवे पाऊल.  

 

तीन गोष्टींवर निवड समितीच्या बैठकीत उद्या होऊ शकते सर्वाधिक चर्चा

1. धोनीचे भविष्य : पहिली पसंती नाही, मोठा निर्णय शक्य नाही

एम.एस. धोनीने गेल्या २ वर्षांत जवळपास ४५ च्या सरासरीने आणि ८० च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या आहेत. त्याच्या फलंदाजीचा संघावर पहिल्या सारखा प्रभाव राहिला नाही. विश्वचषकात त्याने यष्टिरक्षक म्हणून २० पेक्षा अधिक अतिरिक्त धावा दिल्या. धोनी आता प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक नसेल, असे बीसीसीआयकडून संकेत मिळाले आहेत. संघ व्यवस्थापन भविष्याचा विचार करून ऋषभ पंतच्या सुधारणेवर काम करेल. मात्र, पंतसह संघातील युवा खेळाडूंसाठी धोनीचे उपलब्धी महत्त्वाची आहे. आता धोनी १५ सदस्यीय संघात राहील, मात्र, अंतिम ११ मध्ये नसेल. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीची आतापर्यंत बातमी नाही. सध्या तो विंडीज दौऱ्यातून आपले नाव मागे घेऊ शकतो. 
 

2. विराटचे नेतृत्व : पद काढणे कठीण, भारतात “स्प्लिट कॅप्टेंसी’ नाही चालत 

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ७७ पैकी ५६ वनडे जिंकले आहेत, म्हणजे जवळपास ७४ टक्के विजय मिळवले. केवळ एका खराब सामन्याच्या आधारे त्याचे कर्णधारपद जाणे कठीण आहे. िवराटच्या जागी रोहित शर्माला मर्यादित षटकांच्या स्पर्धेत कर्णधार बनवण्याचा विचार केल्यास रोहितच्या नेतृत्वात भारताने १० पैकी ८ वनडे जिंकले आहे. एशिया कप देखील जिंकला. रोहित आयपीएलचा देखील यशस्वी कर्णधार आहे. मात्र, भारतात “स्प्लिट कॅप्टेंसी’  म्हणजे कसोटी व वनडेत वेगळा कर्णधार असा प्रयोग जास्त चालत नाही. 

 

3. मधल्या फळीची समस्या : मनीष पाण्डेय, श्रेयस, मयंकची दावेदारी 
भारत अ संघाकडून खेळताना विंडीज अ विरुद्ध श्रेयस अय्यरने एक अर्धशतक आणि एका सामन्यात ४७ धावा काढल्या. कर्णधार मनीष पाण्डेयने देखील एक शतक झळकावले. शुभमन गिलने दोन अर्धशतक काढले. या तिघांनी टीमसाठी आपली दावेदारी मजबूत केली. विशेष म्हणजे तिघे मधल्या फळीत खेळू शकतात, भारताची मोठी समस्या मधली फळी आहे. तसेच केदार जाधव आणि दिनेश कार्तिकची निवड होते की नाही, यावर देखील लक्ष असेल. 

 

प्रशिक्षक निवडीमध्ये विराट नाही

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक व स्पोर्ट स्टाफच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली, ती ३० जुलैपर्यंत पूर्ण होऊ शकते. रवि शास्त्रींचा दुसऱ्या अर्ज करणे निश्चित आहे. विश्वचषकातील उपांत्य सामना गमावल्यानंतर शास्त्री आपल्या पदावर कायम आहेत. मंडळानुसार, त्यांनी प्रशिक्षक असताना त्याचे काम खराब नाही, ज्यामुळे त्यांना बाजूला केले जाईल. मात्र, यंदा विराट प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेतून स्वत:ला दूर ठेवू शकतो. तरी देखील त्याचा सल्ला मागितल्यास, त्याने शास्त्रीच्या बाजूने बोलल्यास मंडळाला कर्णधाराचा शब्द मोडणे सोपे नाही.

 

विंडीज दौऱ्याचा कार्यक्रम
> टी-२० सामने : ३,४ व ६ ऑगस्ट रोजी
> वनडे सामने : ८, ११ व १४ ऑगस्ट रोजी
> कसोटी लढत : २२ व ३० ऑगस्टपासून