मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये आले सर्व खेळाडू, पण धोनी अचानक गेला स्टॅंड्समध्ये; नंतर जे घडले ते पाहून सर्वजण झाले भावूक

दिव्य मराठी वेब टीम

Apr 06,2019 03:43:00 PM IST

स्पोर्ट डेस्क - सुपर कुल महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स त्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही. आयपीएलच्या 15 व्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा 37 धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघ ड्रेसिंग रुममध्ये परतले. पण महेंद्रसिंह धोनी अचानक खाली स्टॅंड्स मध्ये आला. तिथे एक आजी धोनीची भेट घेण्यासाठी थांबल्या होत्या. त्यांच्या सोबत एक तरुणी सुध्दा आली होती. धोनीने त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि फोटोही काढले.


या आजीच्या हातात 'मी येथे फक्त धोनीसाठी आले आहे' असे लिहिलेले एक पोस्टर होते. धोनीने त्या पोस्टरवर ऑटोग्राफ दिला. तसेच आजीसोबत आलेल्या तरुणीने आणलेल्या चेन्नईच्या जर्सीवरही धोनीने ऑटोग्राफ दिला.

X
COMMENT