आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवाग, गंभीर भाजपच्या तिकीटांवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, धोनी सुद्धा BJP च्या गळाला लागणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मुल्तानचा सुल्तान विरेंद्र सेहवागसह आणखी दोन प्रसिद्ध क्रिकेटर्स भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यात भारताचा कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणारा महेंद्र सिंग धोनी आणि गौतम गंभीर या दोघांचीही नावे घेतली जात आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरला दिल्लीत मीनाक्षी लेखी यांच्या जागी उमेदवारी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तिन्ही क्रिकेटर्सपैकी सेहवाग आणि गंभीर यांची नावे निश्चित मानली जात आहे. परंतु, धोनी भाजपच्या गळाला लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या तिघांपैकी कुणीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया जाहीर केली नाही.

 

भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज सेहवाग आणि गौतम गंभीर भाजप आणि सरकार समर्थक ट्वीट्साठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ट्वीट्सवर अनेकदा वाद सुद्धा झाले. त्यामुळे, सेहवाग आणि गंभीर भाजपकडून बॅटिंग करतील याची शक्यता नकारता येत नाही. मूळचा दिल्लीचा आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळलेला गंभीर दिल्लीतूनच भाजपचे तिकीट मिळवू शकते. त्याला विद्यमान भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी येत्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचे तिकीट मिळणार अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपने धोनी, सेहवाग आणि गंभीर अशा तिघांनाही निवडणूक लढवण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु, धोनी यासाठी तयार होईल याची शक्यता कमीच आहे. या तिघांपैकी कुणीही अद्याप या वृत्तास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...