आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल फिक्सिंगवर धोनी म्हणतो - खेळाडूंचा दोष काय?; 'रोर ऑफ द लाइन' या कार्यक्रमात सोडले मौन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - आयपीएल २०१३ मधील सामना निश्चिती प्रकरण हा आपल्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता. मात्र यात खेळाडूंचा काय दोष, असा सवाल चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग याने विचारला आहे. दोन वेळच्या या विश्वविजयी कर्णधाराने 'रोर ऑफ द लाइन' या कार्यक्रमात आपले मौन सोडले. 

 

भारतीय क्रिकेट जगतात या सामना निश्चिती प्रकरणाने मोठे वादळ उठले होते. चेन्नई सुपर किंग्जवर त्यामुळे २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. धोनी म्हणाला, '२०१३ हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण काळापैकी एक. मी कधीच इतका निराश झालो नाही. याआधी २००७ च्या विश्वचषकादरम्यान निराश झालो होतो. तेव्हा आम्ही साखळी फेरीतच गारद झालो. मात्र आम्ही तेव्हा खराब खेळ केला.' तो म्हणतो की, '२०१३ मध्ये परिस्थिती अगदी वेगळी होती. लोक मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगची चर्चा करायचे. त्यावेळी देशात सर्वत्र हीच चर्चा सुरू होती.' 

 

हॉटस्टारवर प्रसारित 'व्हॉट डीड वुई डू रॉँग' या पहिल्या भागात धोनीने सांगितले, 'खेळाडंूना माहित होते की, त्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे. मात्र ती किती असेल हे जाणून घ्यायचे होते. चेन्नईवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यावेळी अनेक गोष्टी खेळाडू स्वत:वर ओढून घ्यायचे. 

 


कर्णधार म्हणूनही माझा सवाल हाच होता की, यात खेळाडूंची चूक काय? 
मिस्टर कूल म्हणाला की, 'आमच्या संघाची चूक होती. मात्र त्यात खेळाडू सहभागी होते काय? खेळाडूंची काय चूक? त्यांना सर्व सोसावे लाागले. फिक्सिंगशी संबंधित गोष्टींमध्ये माझे नावही जोडले गेले. संघही समाविष्ट असल्याचे चित्र माध्यमात रंगले.' 

 

 

सामना निश्चिती खुनाहूनही गंभीर गुन्हा 
धोनीने खडे बोल सुनावले. तो म्हणाला, 'मला याबाबतीत दुसऱ्यांशी बोलायचे नव्हते. माझ्या खेळावर परिणाम होऊ नये असे मला वाटायचे. माझ्यासाठी क्रिकेट जीव की प्राण आहे. मी आज जो काही आहे ते क्रिकेटमुळेच. फिक्सिंगमुळे लोकांचा क्रिकेटवरील विश्वास उडेल. फिक्सिंग हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे.' 
 

बातम्या आणखी आहेत...