आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा खुलासा-स्वत: धोनी बस चालवत टीमला हॉटेलमध्ये घेऊन गेला होता..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नेहमी शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखला जातो. पण जेव्हा त्याला  वेळ मिळतो तेव्हा तो असे काही करतो की, त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. असाच एक किस्सा समोर आला आहे. खरं तर हा किस्सा 10 वर्षे जुना आहे पण नुकताच तो समोर आलाय. 

 

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार धोनीबीबत लक्ष्मणने त्याच्या पुस्तकात एक किस्सा सांगितला आहे. तो त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी तुमची भेट घालून देतो. 

 

लक्ष्मणने 2008 च्या या प्रसंगाची आठवण करताना त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की, नागपूरमध्ये लक्ष्मण त्याची 100 वी टेस्ट मॅच खेळला होता. त्यावेळी स्वत: धोनी बस चालवून संपूर्ण टीमला हॉटेलला घेऊन गेला होता. त्यावेळी धोनी तिन्ही फॉरमॅटचा कॅप्टन होता. 

 

धोनीबाबत लक्ष्मण असेही म्हणाला की, टीम खराब प्रदर्शन करत असली तरी तो नेहमी शांत राहतो. 2011च्या इंग्लंड सिरिजबद्दल तो म्हणाला की, जेव्हा टीम इंडिया अडचणीत होती तेव्हा धोनीने ताबा सुटू दिला नाही. भारताने ती सिरीज 4-0 ने गमावली पण तरीही धोनी शांत होता. 

 

बातम्या आणखी आहेत...