आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनीला अाॅस्ट्रेलिया, विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतून डच्चू!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बीसीसीअायच्या वतीने शुक्रवारी विंडीज अाणि अाॅस्ट्रेलियाविरुद्ध अागामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घाेषणा केली. दरम्यान या दाेन्ही मालिकेच्या संघातून महेंद्र सिंग धाेनीला वगळण्यात अाले. तसेच विंंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठीच्या संघातून काेहलीलाही डच्चू देण्यात अाला अाहे. त्यामुळे या मालिकेसाठी राेहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली.   


मुरलीची कसाेटीसाठी निवड : अाॅस्ट्रेलिया चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघच जाहीर करण्यात अाला. संघात मुरली विजयची निवड करण्यात अाली. काेहलीच्या नेतृत्वात  संघ  मालिकेत खेळणार अाहे. ६ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात हाेईल.   
केदारला २ वनडेसाठी संधी : मुंबईच्या केदारला विंडीजविरुद्ध उर्वरित दाेन वनडेसाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे ताे २९ अाॅक्टाेबर अाणि १ नाेव्हेंबरला हाेणाऱ्या वनडेत खेळू शकेल.

 

विंडीजविरुद्ध टी-२० संघ 
राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लाेकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, क्रुणाल, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम.  

 

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संघ 
विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, लाेकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडेे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, कुलदीप यादव, यजुवेंद चहल, वाॅशिंग्टन सुंदर, क्रुणाल, भुवनेश्वर, बुमराह, उमेश यादव, खलील अहमद.  

 

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध कसाेटी मालिकेसाठी संघ 
विराट काेहली (कर्णधार), मुरली विजय, लाेकेश राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमान विहारी, राेहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, अार.अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, माे. शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, बुमराह, भुवनेश्वर कुमार.

बातम्या आणखी आहेत...