आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी टी-20 विश्वचषकानंतर घेणार क्रिकेटमधून निवृत्ती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची येथील क्रिकेट मैदानात सरावासाठी जाताना धोनी - Divya Marathi
रांची येथील क्रिकेट मैदानात सरावासाठी जाताना धोनी

आसिफ नईम

रांची - भारतीय  क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंग धोनी निवृत्त होत असल्याच्या वृत्तांवर त्याच्या निकटवर्तीयाने विराम लावला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दैनिक भास्करला सांगितले की, धोनी सध्या निवृत्त होत नाहीये. त्याच्यातही अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे आणि तो देशाची सेवा करत राहील.


माहीच्या मित्राने सांगितले की, २०२० मध्ये होणाऱ्या आयपीएल आणि टी-२० विश्वचषकानंतरच धोनी निवृत्त होण्याबाबत विचार करू शकतो. त्याने सांगितले की, बीसीसीआयलाही धोनीने आता निवृत्त होऊ नये असे वाटते. धोनीने आताच निवृत्ती घेतली तर प्रायोजकांबरोबरच प्रेक्षकांवरही याचा मोठा प्रभाव पडेल. यामुळे धोनी पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी- २० विश्वचषकाच्या भारतीय संघात राहील. धोनीच्या जवळच्या मित्रांपैकी एक मिहिर दिवाकरनेही भास्करला सांगितले की, धोनी सध्या क्रिकेट खेळत राहील. मिहिरने सांगितले की, धोनी आयपीएल आणि विश्वचषक टी-२० च्या तयारीला लागला आहे.