आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीचा करिश्मा संपला; यापुढे टी-20 मधून वगळण्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रीय निवड समितीच्या टी-२० क्रिकेटच्या भावी योजनेत ३८ वर्षींय महेंद्रसिंग धाेनी फिट बसत नाही. अशा प्रकारे समितीने संघ व्यवस्थापनामार्फत धोनीला कळवले आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषक भारताला मिळवून  देणाऱ्या धोनीचे या फाॅरमॅटमधील  सामन्यांचे शतक पूर्ण करण्याचे स्वप्न मात्र अपुरे राहण्याचे चित्र अाहे. धोनीचा या क्रिकेटमधील पर्याय पाहण्यास निवड समितीने सुरुवात केली आहे. ज्या चतुराईसाठी, समयसूचकतेसाठी आणि निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता असण्याबाबत धोनी प्रसिद्ध होता, त्याच्यातील तो करिश्मा आता संपुष्टात आल्याची जाणीव निवड समितीला आणि त्याच्या चाहत्यांनाही झाली आहे. त्यामुळे त्याचा यापुढे या फाॅरमॅटसाठी विचार केला जाणार असल्याचेही समितीने सूचित केले. त्यामुळे २०१९ इंग्लंडमधील विश्वचषकाने भारतीय क्रिकेटमधील धोनी  युगाची  सांगता होईल हेही आता स्पष्ट झाले आहे .

 
ब्रेबॉर्न स्टेडियमवर नेट्समध्ये सरावासाठी आलेल्या धोनीचा नूर काही वेगळाच होता. त्याने नेट्समधून स्टेडियमच्या सर्व भागात मोठे  व हुकचे फटकेदेखील अधिक उत्साहात मारले. त्यामुळे जाता जाता  कौशल्याची चुणूक दाखवूनच  अलविदा करण्याचा त्याचा मनोदय  स्पष्ट होत होता. 

 

ऋषभ, कार्तिकची पर्यायी म्हणून निवड 

ऋषभ पंत व दिनेश कार्तिक या दोन यष्टिरक्षकांना धोनीचा पर्याय म्हणून निवडण्यात आले आहे.दिल्लीच्या ईशान किशन यांच्याकडेदेखील भारताचा भावी यष्टिरक्षक म्हणून पाहिले जात आहे.  वय वाढलेल्या धोनीला  ऐन मोक्याच्या क्षणी धावा वेगात वाढवणे सध्या जमत नाही. महत्त्वाच्या क्षणी अचानक त्याची विकेट पडल्यामुळे भारतीय संघ  अडचणीत सापडताे.

 

टीम इंडियाची नजर अाज विजयावर

गत सामन्यातील पराभवातून सावरलेला यजमान भारतीय संघ अाता मालिकेत विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाला अाहे. भारताची नजर विजयासह अाघाडीवर अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यातील चाैथा वनडे सामना अाज साेमवारी मुंबईच्या मैदानावर रंगणार अाहे. गत सामना जिंकून पाहुण्या विंडीज संघाला मालिकेत १-१ ने बराेबरी साधता अाली. अाता विजयाची ही लय चाैथ्या वनडेतही कायम ठेवण्याचा विंडीज संघाचा प्रयत्न असेल. मात्र, टीम इंडियाने पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली. त्यामुळे हा सामना रंगतदार हाेण्याचे चित्र अाहे.  
पुण्याच्या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली (१०७) अाणि नंबर वन गाेलंदाज जसप्रीत बुमराहला (४ बळी) अव्वल कामगिरी करता अाली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. काेहलीने मालिकेत सलग तिसरे शतक झळकावून विक्रमाला गवसणी घातली. तर, बुमराहने करिअरमध्ये चाैथ्यांदा सामन्यात चार विकेट घेतल्या. इतर फलंदाजांच्या सुमार खेळीमुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला.  
दरम्यान, विंडीजकडून सॅम्युअल्सने धारदार गाेलंदाजी केली. त्याने तीन महत्त्वपूर्ण विकेट काढल्या. याचा टीम इंडियाला माेठा फटका बसला.   

 

संभाव्य संघ 
भारत : विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धाेनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लाेकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव  

 

वेस्ट इंडीज 
जेसन हाेल्डर (कर्णधार), अॅलेन, सुनील अाम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंद्रपाॅल हेमराज, हेटमेयर, हाेप, अल्झारी जाेसेफ,लेव्हिस, अल्शे नुर्स, किमाे पाॅल, राेवमान पाॅवे, केमार राेच, सॅम्युअल्स.

 

बातम्या आणखी आहेत...