आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतवंशीय ध्रुव प्रभाकर 15 मिनिटांत 87 नावे व चेहरे पाठ करून 'मेमरी चॅम्पियन'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- सिंगापुरात राहणारा भारतवंशीय ध्रुव प्रभाकर याने हाँगकाँगमध्ये झालेल्या 'वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप'मध्ये दाेन सुवर्णपदके पटकावली. ध्रुवने विद्यार्थ्यांच्या गटात 'नेम्स अँड फेसेज' व 'रँडम व‌र्ड्स' स्पर्धेत इतर ५६ स्पर्धकांवर विजय मिळवला. २० ते २२ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा आयाेजित केली हाेती. त्यात चीन, भारत, तैवान, रशिया व मलेशियासह अनेक देशांमधील २६० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सिंगापूरमध्ये केवळ ध्रुवने या स्पर्धेत सहभाग घेतला. 'मेमरी पॅलेस' बनवण्याच्या रोमन तंत्रज्ञानात ध्रुवने अर्ध्या तासात १,१५५ बायनरी अंक लक्षात ठेवले. त्याला ८७ नाव चेहरे लक्षात ठेवण्यासाठी केवळ १५ मिनिटे लागले. मेमरी पॅलेस तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्ती वस्तू व घटनांची फाेटाे मेंदूतील वेगवेगळ्या भागांत संग्रहित करते. 

 

ध्रुवने म्हटले, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यानाबराेबर अनेक तास मला अभ्यास करावा लागत हाेता. वडील मनोज प्रभाकर यांची मला खूप मदत झाली. मनोज व्यवसायाने अभियंते आहे. अनेक वर्षांपासून ते सिंगापूरमध्येच राहत आहेत. मनाेज प्रभारक म्हणतात, धुव्र राेज दाेन तास स्मरणशक्तीचा अभ्यास करत हाेता.