Accident / धुळेः लळिंग घाटाजवळ तिहेरी अपघात; मालेगावला जाणाऱ्या 4 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

चुकीच्या दिशेने घुसलेल्या ट्रकने अॅपे रिक्शासह दुसऱ्या ट्रकला दिली धडक

दिव्य मराठी

Jun 12,2019 04:02:00 PM IST

धुळे - येथील मुंबई-आग्रा महामार्गावर दुभाजक तोडून उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकमुळे बुधवारी तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. या भीषण अपघातात अमळनेरहून मालेगावकडे जाणारे चार जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये एका सात वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. यासोबतच, 6 जण जखमी असून त्यांना ताततडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सगळेच सुरतचे रहिवासी आहेत. धुळेजवळ झालेल्या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.


धुळे शहरानजीक लळिंग घाटात बुधवारी दुपारी एक भरधाव ट्रक उलट्या दिशेने येत होता. या ट्रकने दुभाजक तोडले. यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अॅपे रिक्शावर धडकला. यानंतर दोन्ही वाहन दुग्ध घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला जाऊ आदळले. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर चौथ्याचा उपचारासाठी नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सर्वच प्रवासी अॅपे रिक्शाने अमळनेर येथून मालेगावकडे जात होते. अपघात झाला तेव्हा रिक्शात आठ जण होते. मृतांमध्ये आलिया लुकमान शेख (7), नौशाद बी अहमद अली (40), अहमद अली साहब अली (47) तसेच एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की रिक्शा आणि आयशर वाहनाचे छप्पर पूर्णपणे फाटले. या अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये, शौकत खान करीम, साक्री; विक्की नंदलाल ठाकरे (25), पारोळा आणि अतुल चैत्राम पाटील, पारोळा यांचा समावेश आहे.

X