आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंच आता नगरसेवकपदासाठी लढणार; भाजप-काँग्रेस उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये पूर्वी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या नकाणे, महिंदळे, मोराणे परिसरातील वसाहतींचा समावेश आहे. या प्रभागातून दोन उपसरपंचासह दोन सरपंचाच्या पत्नी आता नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे. प्रभागात उमेदवारी करणाऱ्यांमध्ये बहुतांश चेहरे नवीन आहे. या प्रभागात कॉग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

 
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या मोराणे गावाचा शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये समावेश झाला आहे. त्याचबरोबर महिंदळे व नकाणे गावासह नकाणे रस्त्यावरील काही वसाहतींही या प्रभागात आहे. प्रभागात उमेदवारी करणारे काही उमेदवार मोराणे येथील तर काही महिंदळे येथील रहिवासी आहेत. त्यामुळे या उमेदवारांचा प्रभाग त्या-त्या भागपुरता मर्यादीत असल्याचे दिसून येते. प्रभागातील अ जागेवर भाजपतर्फे मोराणे येथील निंबाबाई फुलसिंग भील, काँग्रेसतर्फे सोनाली सोनवणे व शिवसेनेतर्फे आरास्तोलबाई पारधी रिंगणात आहेत. सोनाली सोनवणे यांचे पती मोराणे येथील सरपंच होते. त्यामुळे त्यांचा प्रभागातील काही भागात चांगला संपर्क आहे.

 

दुसरीकडे भाजप व शिवसेनेच्या महिला उमदेवारांचा प्रभागात फारसा परिचय नाही. प्रभागातील ब जागेवर शिवसेनेतर्फे कल्पना चित्ते, कॉंग्रेसतर्फे सीमा पाटील व भाजपतर्फे निशा पाटील व एक अपक्ष उमेदवार आहेत. कल्पना चित्ते यांचे पती मुकेश चित्ते महिंदळे ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्याचबरेाबर सीमा पाटील यांचे पती दिनेश पाटील महिंदळेचे सरपंच होते. या प्रभागात भाजप, शिवसेना व कॉंग्रेसच्या उमेदवारामध्ये तिरंगी लढत होईल. तिन्ही पक्षाच्या उमेदवारांचा प्रभागात चांगला संपर्क आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होऊ शकते.

 

प्रभागातील क जागेवर मोराणे येथील माजी उपसरपंच मयूर ठाकरे कॉंग्रेसकडून उमेदवारी करत आहे. अपक्ष उमेदवार योगेश पाटील यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. भाजपतर्फे महिंदळे येथील रावसाहेब पाटील उमेदवारी करीत आहे. त्याचबरोबर एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. या जागेवर मयूर ठाकरे व रावसाहेब पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांचा राजकीय व सामाजिक दबदबा आहे.

 

प्रभागातील ड जागेवर भाजपचे किरण अहिरराव व कॉंग्रेसतर्फे वलवाडीच्या उपसरपंच गुणवंत वाघ रिंगणात आहे. या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे. या प्रभागात उमेदवारी करणारे अनेक उमेदवार सर्व भागात पोहचलेले नाहीत. बहुतांश उमेदवारांची भिस्त गावातील मतदारांचे एकगठ्ठा मते मिळवण्याकडे आहे. या प्रभागात भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांमध्येच लढत होईल. प्रभाग क्रमांक सहामध्ये चार जागांवर काँग्रेस व भाजपतर्फे उमेदवार देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवसेनेतर्फे केेवळ दोन जणांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने क जागेवर अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले आहे. 

 

गावाचा समावेश 
जानेवारीमध्ये महापालिकेची हद्दवाढ करण्यात अाली. त्यात शहर परिसरातील अकरा गावांचा समावेश करण्यात अाला. त्यात महिंदळे, माेराणे व नकाणे या गावांचा समावेश करण्यात अालेला अाहे. ही तिन्ही गावांचा मिळून प्रभाग क्रमांक सहा तयार झालेला अाहे. या प्रभागात १२ हजार ८४२ मतदार अाहेत. त्यांच्याकडून भावी नगरसेवकांची निवड केली जाणार अाहे.अातापर्यंत ग्रामपंचायती असलेल्या या गावांमध्ये निधीअभावी फारसे विकास कामे झालेली नाही.

 

माेराणे वगळता अन्य दाेन्ही गावांत अनेक नागरी सुविधाचा अभाव अाहे. त्याच प्रामुख्याने अंतर्गत व मुख्य रस्तयाची समस्या अाहे. तसेच सांडपाणी व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर अाहे. या प्रभागावर ग्रामीण भागातील राजकीय प्रभाव माेठ्या प्रमाणावर अाहे. त्यातही काॅग्रेसचे वर्चस्व दिसून येते. अाता भाजपने तेथे अाव्हान उभे केले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...