आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपपुढे जळगावचीच गणिते; तिथे खडसे तर इथे गाेटे; तिथे सुरेश जैन तर इथे कदमबांडे; अाखाडा हवा तसाच मात्र आव्हान कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भाजपने सध्या अंडरकरंट कायम राहील याची काळजी घेतली अाहे. त्या वेळी राष्ट्रवादीनेही तीच रणनीती अवलंबली अाहे. मात्र भाजपसाठी धुळ्याचे रणांगण जळगावसारखेच झाले अाहे. त्यामुळेच मंत्री गिरीश महाजनांनीही महापालिकेच्या निवडणुकीत रस घेतला अाहे. मुळात जळगावात जी स्थिती हाेती ती शहरातही कायम अाहे. भाजपमधीलच अामदार एकनाथ खडसे जळगावात हाेते. त्या जागेवर अामदार अनिल गाेटे अाहेत. तर माजी अामदार सुरेश जैन यांच्या जागेवर माजी अामदार राजवर्धन कदमबांडे अाहेत. 

 

धुळे महापालिका भाजपसाठी इतकी समान राहील, असे भाजपच्या नेत्यांनाही वाटत नव्हते. पण सध्याचे चित्र पाहिले तर जळगाव महापालिकेइतकीच राजकीय स्थिती समान अाहे. भाजपच्या मंत्र्यांविराेधात प्रारंभी अामदार गाेटे यांनी वातावरण तापविले. अंतर्गत कलहात भाजप पाेळताेय, असे चित्र असताना पदाधिकारी मात्र शांतपणे कामे करीत हाेते. भाजपला काही अाघाड्यांवर कठीण स्थिती वाटत हाेती. मुळात जळगाव महापालिका निवडणुकीत अामदार एकनाथ खडसे यांचे काही उमेदवार हाेते. मात्र त्यांचे काय झाले, हे निवडणुकीनंतर समजले. अाता खडसेंच्याच ठिकाणी असलेल्या अामदार अनिल गाेटेंची स्थिती पाहिली तर त्यांनाही भाजपच्या मंत्र्यांवर अाराेप करणे भाग पडले. खडसेंची राजकीय काेंडी झाली. तशीच अामदार गाेटेंची राजकीय काेंडी झाली. खडसेंनी इतर राजकीय पक्षांना चुचकारून पाहिले. तशी भूमिका सध्या गाेटे घेत अाहेत. खडसे अाराेपांमधून लवकरच मुक्त हाेतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांसह बहुतांश मंत्र्यांनी वेळ मारून नेली. तसेच अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी अामदार गाेटे यांना दिले अन् वेळ मारून नेली. काेणताही नेता खडसे किंवा त्यांच्या जागेवर असलेल्या गाेटेंना विचारत नाही, असे दिसते. 

 

चमत्कार होण्याबाबत नेत्यांनाही शंकाच... 

दुसरी स्थिती माजी अामदारांची अाहे. जळगावात सुरेश जैन यांनी जी जाग घेतली ती धुळ्यात राजवर्धन कदमबांडे यांनी घेतली अाहे. फरक इतकाच अाहे की, जैन फारसे अाक्रमक राहिले नाही. प्रचारातही फार काळ उतरले नाही. मात्र कदमबांडे यांनी भाजपच्या नेत्यांना त्रस्त केले अाहे. त्याचवेळी शहरातील सगळ्याच भागांमध्ये फिरून प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली अाहे. भाजपला ही स्थिती समप्रमाणात अाहे, असे वाटते. पण जळगावात झालेला चमत्कार धुळे शहरात हाेईल, याबाबत मात्र शंका कायम अाहे. 

 

गाेटे, कदमबांडेंची अवस्था अर्जुनासारखी 
अामदार अनिल गाेटे व राजवर्धन कदमबांडे यांची अवस्था सध्या महाभारतातील युद्धामधील अर्जुनासारखी झाली अाहे. त्यांच्यासमाेर सगळे अापलेच लाेक अाहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले व भाजपमधीलच काही उमेदवारांविराेधात प्रचाराची धुरा सांभाळावी लागत अाहे. मुळात भाजपने गाेटेंना साथ दिली असती तर प्रचारातील अाराेप- प्रत्याराेपांचा राेख या दाेघांनी एकमेकांकडे वळवला असता. मात्र, अाता ती संधी उरलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...