आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेत्री दिया मिर्झाने सोमवारी आपल्या 38 व्या वाढदिवशी नवीन प्रॉडक्शन हाऊस 'वन इंडिया स्टोरीज' लाँच केले. या प्रॉडक्शन हाऊसमध्ये केवळ महत्त्वाच्या व अर्थपूर्ण कथा बनवल्या जातील. वन इंडिया स्टोरीज एलएलपीच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी अनन्यसाधारण कंटेंट तयार करणे हा दियाचा उद्देश आहे. दिया म्हणाली की, 'माझी अनेक कंटेंट क्रिएटर, स्क्रिप्ट रायटर आणि चित्रपट निर्मात्यांसोबत चर्चा सुरू आहे.' दिया लवकरच या प्रॉडक्शन हाऊसच्या प्रोजेक्ट्सची घोषणा करणार आहे.
दिया पुढे म्हणाली, "माझ्या मते, आपण सर्व एकता आणि मानवतेच्या धाग्यांनी बांधलेलो आहोत. वन इंडिया स्टोरीजची स्थापनाही हाच विचार करून करण्यात आली. तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील अशाच कथा आम्ही बनवू इच्छित आहोत. ही माझ्यासाठी खूपच चांगली सुरुवात आहे. आम्ही आमच्या प्रत्येक कथेमध्ये आपला दृष्टिकोन दाखवण्यात सक्षम राहू, अशी आशा आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून लोकांना नेहमीच काही चांगले मिळावे यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम प्रामाणिकपणे मेहनत करत आहोत.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.