आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आजारात शरीराच्या चार भागांची अशी घ्यावी काळजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात जवळजवळ 8 ते 10 कोटी लोकांना मधुमेह आहे. यावर नियंत्रण मिळवणे फार गरजेचे आहे. नाहीतर शरीराच्या अनेक भागावर याचा परिणाम हाेतो.

  • मधुमेह म्हणजे काय ?

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजेच मधुमेह. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या स्वादूपिंड या अवयवातून पाझरणाऱ्या इन्शुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींत सामावली जाण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. इन्शुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मुत्राशयाचे विकार उद्भवू शकतात. या विकारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्तफिल्टर होऊन तयार होणाऱ्या मुत्रातही शर्करेचे प्रमाण आढळते. मधुमेह किंवा डायबेटिस हा शरीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्शुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो.

  • हृदय

मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा तीन पट जास्त असतो. एक महत्त्वाची गोष्ट अशी की, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा या रुग्णांना छातीत दुखत नाही. हृदयविकाराचा झटका आल्यास हे रुग्ण केवळ अस्वस्थता, उलट्या, दम लागणे किंवा घाम येणे या तक्रारी करतात. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी वर्षातून एकदा आपल्याला हृदय तपासणी करणे गरजेचे अाहे. रक्तदाब नियंत्रित ठेवा, नेहमी कोलेस्ट्रॉलची औषधे घ्या आणि वेळोवेळी कोलेस्ट्रॉल तपासा. आपल्या शुगर पातळीवर नियंत्रण ठेवा. वजन वाढवू देऊ नका आणि नियमित व्यायाम करू नका.

  • किडनी

पायाला सूज येणे, साखर वारंवार कमी हाेणे किंवा भूक कमी लागणे, हे किडनी खराब हाेण्याची लक्षणे अाहेत. साखर नियंत्रणात नसल्यामुळे किडनीवर परिणाम हाेताे. रक्तदाब नियंत्रित करणेदेखील महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा किडनीचा त्रास वाढताे तेव्हा हृदयविकाराचा धोका वाढतो.

  • त्वचा

वारंवार फोडे-पुटकुळ्या होणे, जखम लवकर न भरणे, जननेंद्रियांमध्ये खाज येणे इत्यादी लक्षणे साखर नियंत्रणात न ठेवल्याने उद्भवतात. मधुमेहात त्वचा आणि गुप्तांगाची स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, दीर्घकालीन मधुमेह असल्याने पायातील संवेदना कमी होऊ लागतात. यामुळे रुग्णाला जखम आणि संसर्ग जाणवत नाही. त्यामुळे लहान जखमदेखील गँगरीनचे रूप घेऊ शकते.

  • डाेळे

मधुमेहाच्या सर्व रुग्णांनी नेत्ररोगतज्ज्ञांकडून वर्षातून एकदा तरी नेत्र तपासणी केली पाहिजे. डोळ्यांच्या पडद्यावर सूज येणे, रक्त गाेठणे आणि कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे दिसणेही बंद हाेऊ शकते. तथापि, सुरुवातीस या रोगाचे कोणतीही लक्षणे लवकर दिसत नाहीत. त्यामुळे डाॅक्टरांच्या संपर्कात राहिल्याने लेजर किंवा इतर उपचाराद्वारे डाेळ्याची दृष्टी वाचवता येऊ शकते.

काय करावे
- डाॅक्टरांच्या सांगण्यावरुन आहार घ्यावा.
- नियमित व्यायाम करावा.
- वेळोवेळी साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल इत्यादींची तपासणी करत राहा.
- आपल्या डॉक्टरांची औषधे नियमितपणे घ्या. मनाने कोणतेही औषध थांबवू नका.
- मधुमेह दूर करणाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवर विश्वास ठेऊ नका. आरोग्याला त्रास होऊ शकतो.
- मधुमेहाविषयी माहिती वैज्ञानिक स्रोत आणि आपल्या डॉक्टरांशी बोलूनच मिळवा. गुगल व व्हॉट्सअ‍ॅपवरील माहितीवर विश्वास ठेऊ नका.
- धूम्रपान, तंबाखू आणि मद्यपान टाळा. या रुग्णांनी गर्भधारणेदरम्यान खबरदारी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...