Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | diabetes patient insulin information in Marathi

इन्सुलिन घेणाऱ्या रुग्णांनीही तितकीच पथ्ये पाळायला हवीत 

दिव्य मराठी | Update - Mar 13, 2019, 02:45 PM IST

टाइप-2 मधुमेह असलेल्या ज्या रुग्णांना इन्सुलिन सुरू आहे, त्यांनी फार पथ्ये पाळण्याची गरज नाही, असा सर्वसामान्य समज आहे.

  • diabetes patient insulin information in Marathi

    टाइप-2 मधुमेह असलेल्या ज्या रुग्णांना इन्सुलिन सुरू आहे, त्यांनी फार पथ्ये पाळण्याची गरज नाही, असा सर्वसामान्य समज आहे. इन्सुलिन तर शरीरात कार्यरत आहे, असे म्हणून लोक बेफिकीर राहतात. पण खरे मधुमेहाच्या प्रत्येक उपचार पद्धतीत खाण्या-पिण्यातील पथ्य आवश्यक असतात. टोटल डायबेटीज हार्मोनल इन्स्टिट्यूटचे डॉ. सुनील जैन यांनी सांगितले की, इन्सुलिन सुरू आहे म्हणजे आपण काहीही खाऊ शकतो, असा अर्थ होत नाही. टाइप-१ मध्ये तर इन्सुलिन आवश्यकच असते. टाइप-२ चे काही रुग्ण खाण्यातील पथ्य पाळत नाहीत. पण कोणतेही औषध निष्प्रभ ठरू लागल्यावर इन्सुलिन सुरू केले जाते. फास्ट फूड किंवा जास्त स्टार्च असलेले अन्न सेवन केल्याने इन्सुलिनचा डोस वाढवण्याची गरज असते.


    असे केल्याने वजन वाढते आणि इन्सुलिनची सक्रियता कमी होऊ लागते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार इन्सुलिन घ्यावे लागू शकते. हे एक जणू दुष्टचक्रच आहे. उदा. स्थूलपणा, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार आणि हृदय विकार हे सर्व हातात हात घालून येतात. इन्सुलिनने मधुमेहाचा प्रभावी उपचार करायचा असेल तर आ‌वश्यक तेवढेच अन्न सेवन करावे. पित्ताशयातील बीटा सेल्स इन्सुलिन हार्मोन्स निर्माण करतात. तणाव, अनिद्रा आणि नैराश्याच्या स्थितीत या बीटा सेल्स निष्कामी ठरू लागतात. त्या नष्ट झाल्यास इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे ताण येतो तेव्हा रक्तशर्करेचे प्रमाण वाढते.

Trending