आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात दोघांना कोरोना संसर्गाचे निदान झाल्यावर शेअर बाजारात भीतीचे सावट, दुपारच्या वृद्धीनंतर वेगात घसरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ७ सत्रांत ३,१७९ अंक घसरला सेन्सेक्स, गुंतवणूकदारांची संपत्ती १३ लाख कोटी कमी
  • अनेक देशांत विषाणूच्या प्रभावामुळे निर्यात व पुरवठ्याच्या साखळीवर परिणाम

मुंबई/नवी दिल्ली - भारतात दाेघा रुग्णांना काेराेना विषाणू संसर्गाचे निदान झाल्याचे वृत्त आल्यानंतर देशातील शेअर बाजारांत भीतिदायक वातावरण तयार झाले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा दबाव वाढवला. सकाळी बीएसई सेन्सेक्स ६१४ अंकांच्या मजबुतीसह ३८,९११ वर खुला हाेता. दुपारपर्यंत ७८६ अंकांची वाढ प्राप्त करून दिवसातील उच्च पातळी ३९,०८३ला स्पर्श केला हाेता. मात्र, अखेरच्या एका तासात व्यवसायात विक्री वाढल्याने हा १,२९७ घसरला आणाि दिवसाच्या नीचांकी पातळी ३९,०८३ वर आला. सत्र समाप्तीआधी नीचांकी स्तरावर खरेदीदारी निघाल्याने ताे सावरला. मात्र, घसरणीतून वर येऊ शकला नाही. सायंकाळी १५३.२७ अंकां(०.४०%)च्या नुकसानीसह ३८,१४४.०२ वर बंद झाला. या पद्धतीने निफ्टीतही दिवसाच्या उंचीवरून ३९७ अंक घसरल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी हाही ६९ अंकां(०.६२%)च्या नुकसानीसह ११,१३२.७५ वर बंद झाला. सकाळी निफ्टी १८५.६० अंकांच्या बळकटीसह ११,३८७.३५ वर खुला झाला. व्यवसायादरम्यान त्याने २३१ अंकांच्या वाढीसह ११,४३३ च्या उंचीस स्पर्श केला. यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने त्याने ११,०३६चा दिवसाच्या नीचांकी स्तरास स्पर्श केला. सलग सात सत्रांच्या घसरणीत सेन्सेक्स आतापर्यंत ३,१७९ अंक खाली आला. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य १२.९० लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त कमी झाले. १९ फेब्रुवारीला बीएसईचे बाजार भांडवल १५८.७१ लाख काेटी रु. हाेते. २ मार्चला सत्र समाप्तीपर्यंत हे १४५.८१ लाख काेटी रु. राहिले. बीएसई मिड व स्माॅल कॅप इंडेक्स ०.७७% नुकसानीत बंद झाला. एसबीआय, टाटा स्टील, हीराे माेटाेकाॅर्प, बजाज आॅटाे, आेएनजीसी आणि इंडसइंड बँक टाॅप लूझर्स राहिले. एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि इन्फाेसिस टाॅप गेनर्स राहिले.चीननिर्मित स्मार्टफाेनचा साठा भारतात संपण्याच्या स्थितीत


चीननिर्मित स्मार्टफाेनची भारतात आता कमतरता भासत आहे. रिटेलर्सनुसार, चीनमध्ये तयार स्मार्टफाेनचा सध्या दुकानांवर १० ते २० टक्क्यांपर्यंत पुरवठा हाेत आहे. अॅपलवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. आयफाेन-११ चा पुरवठा ठप्प झाला आहे. निर्मिती वृद्धीत किरकोळ घट, फेब्रुवारीत पीएमआय ५४.५


जगातील अनेक देशांत कोरोना विषाणू संसर्गाचा परिणाम फेब्रुवारीत भारतातील मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन काहीशा घटलेल्या स्थितीवरून दिसला. आयएचएस मार्केट इंडियानुसार, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्जेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) फेब्रुवारी २०२० मध्ये ५४.५ नोंदला आहे. हा जानेवारीचा आकडा ५५.३ ते ०.८ अंक कमी आहे. मात्र, हा सलग ३१ महिन्यांपासून वर आहे. पीएमआय ५० वर राहणे क्षेत्रातील उत्पादनात वाढ हाेणे आणि ५० पेक्षा कमी राहणे घसरण दर्शवताे. आयएचएस मार्केटच्या मुख्य अर्थतज्ञ डी. लिमा म्हणाल्या, कोरोना विषाणू संसर्गामुळे भारतीय माल उत्पादकांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. जगातील अनेक देशांत या विषाणूच्या प्रभावामुळे निर्यात आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे.फेब्रुवारीमध्ये बेरोजगारी दर ७.७८%वर, ४ महिन्यांत सर्वाधिक


फेब्रुवारीमध्ये बेरोजगारी दर वाढून ७.७८% वर पोहोचला आहे. हा जानेवारीतील ७.१६% च्या तुलनेत ०.६२% जास्त आहे. ऑक्टोबर २०१९ नंतर चार महिन्यांत याची सर्वात उच्च पातळी आहे. बेरोजगारी दराशी संबंधित अहवाल मुंबई स्थित एक खासगी थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमि(सीएमआयई)ने जारी केला आहे. त्यानुसार, आर्थिक मरगळीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडत आहे. २०१९ च्या अखेरच्या तीन महिन्यांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर सहा वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. अहवालात नमूद केल्यानुसार, फेब्रुवारीमध्ये ग्रामीण क्षेत्रात कमीत कमी रोजगार मिळाले. यामुळे ग्रामीण क्षेत्रात बेरोजगारी दर जानेवारीच्या ५.९७% च्या तुलनेत ७.३७ वर पोहोचला आहे. असे असले तरी शहरी भागात बेरोजगारी दर घटला आहे. हा ९.७० टक्क्यांच्या तुलनेत ८.६५ टक्के राहिला आहे.आशियाई बाजारांत बळकटीतून निघाली खरीददारी

शांघाय, हाँगकाँग, सेऊल आणि टाेकिआेच्या शेअर बाजारांत चांगल्या वृद्धीनंतर देशातील बाजारात गुंतवणूकदारांना खालील पातळीवर खरेदी सरू केली हाेती. मात्र, दाेघांना काेराेना विषाणू संसर्ग झाल्याच्या वृत्तानंतर एका तासाच्या व्यवसायात बाजाराने सकाळी प्राप्त केली वाढ गमावली.
-गौरव दुआ, हेड, कॅपिटल मार्केट स्ट्रॅटेजी अँड इन्व्हेस्टमेंट्‌स, शेअरखानलघु मुदतीत कायम राहू शकताे चढ-उतार

जगभरातील केंद्रीय बँका जागतिक वृद्धीला गती देण्यासाठीच्या उपायांची घाेषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, ताज्या आकडेवारीत पुरवठा घटल्याने देशांतर्गत निर्मितीच्या वृद्धीत घट आली आहे. या पार्श्वभूमीवर लघु मुदतीत देशाच्या शेअर बाजारांत चढ-उतार कायम राहू शकताे.
-विनोद नायर, हेड आॅफ रिसर्च, जियाेजित फायनान्शियल सर्व्हिसेस