आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये एआयद्वारे होतेय कोरोना विषाणू संसर्गजन्य रुग्णांचे निदान; घर आणि शाळांमध्ये नागरिकांच्या शारीरिक तापमानावर देखरेख ठेवणारे तंत्रज्ञान

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

​​​​​​बीजिंग : कोरोना विषाणूवर आतापर्यंत यशस्वी उपचार शोधला गेला नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी अशी पद्धत विकसित केले आहे ज्याद्वारे त्याला अटकाव केला जाऊ शकेल. मिशिगन विद्यापीठ आणि केंब्रिजच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने फायरटायनस नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. याद्वारे कोणत्याही भागात कोरोना विषाणूच्या संभाव्य रुग्णांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान केले जाऊ शकेल. फायरटायनस तंत्रज्ञान एखाद्या भागात शरीराच्या अधिक तापमानाच्या आधारावर संशयित रुग्णाची ओळख करते. निदान झाल्यावर रुग्णाला वेगळे करून रुग्णालयात आणले जाते आणि यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश मिळते. हे तंत्रज्ञान १ हजार चौ. फुटांच्या कक्षेतील १०० लोकांच्या शरीराच्या तापमानाची निगराणी करते. हे काम अर्ध्या मायक्रो सेकंदात होते. या तंत्रज्ञानात इंटिग्रेटेड कॅमेरा सिस्टिम, टेम्प्रेचर सेन्सर, न्यूरल नेटवर्क सिस्टिमचा वापर होतो. रुग्णांची ओळख व्हावी यासाठी वुहान, बीजिंगसह चीनच्या अनेक शहरांत तंत्रज्ञान स्थापन केले जात आहे.

फायरटायनसचे निदान ९९% अचूक असल्याचे तज्ज्ञांचे मत

फायरटायनस एक हार्ड परफॉर्मन्स इंटिग्रेटेड सर्किट आहे. ते निश्चित केलेल्या कक्षेतील लोकांच्या तापमानाचे आकलन करते. त्याची रीडिंग व कुण्या व्यक्तीच्या शरीराचे प्रत्यक्ष तापमानात जास्तीत जास्त ०.१ अंश सेल्सियसचा फरक असतो. तज्ञांनी ही चाचणी ९९% अचूक ठरवली आहे. फायरटायनसमध्ये फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे संशयित रुग्णाची त्वरित ओळख होते. एका फायरटायनस प्रणालीत ज्या १०० लोकांची निगराणी करते त्याच्याशी संबंधित एक सेंट्रलाइज्ड सर्व्हरवर पाठवले जाते.

टि्वटरने ५ हजार कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा दिला सल्ला

कोरोना विषाणूचा संसर्ग चीनव्यतिरिक्त अन्य देशांवरही पडत आहे. या कारणास्तव मोठ्या कंपन्यांनाही फटका बसत आहे. सोशल मीडिया जायंट टि्वटरही यात समाविष्ट आहे. कंपनीने ५ हजार कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी घरातून काम करणे सक्तीचे केले आहे. कंंपनीने सांगितले की, अन्य देशांत त्यांचे कार्यालये सुरू राहतील. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे आवश्यक आहे, ते येऊ शकतात.