आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीने 25 वर्षांपासून काम करणा-या मॅनेजरर्सला गिफ्ट केली 1-1 कोटींची मर्सिडीज, यापुर्वी दिले होते घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत | आपल्या कर्मचा-यांना दिवाळी बोनसमध्ये घर, कार आणि मोपेड देणा-या हरे कृष्ण डायमंड कंपनीने 25 वर्षांपासून त्याच्या कंपनीत काम करत असलेल्या तीन मॅनेजर्सला मर्सिडीज कार भेट दिली आहे. या कारची किंमत एक-एक कोटी आहे. 


मप्रचे राज्यपाल आणि गुजरातच्या माजी सीएमने सोपवली चावी 
मॅनेजर महेश चांदपरा, मुकेश चांदपरा आणि नीलेश जाडा यांना गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि गुजरातचे माजी मुंख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी कारची चावी सोपवली. हे तिन्हीही मॅनेजर कंपनीच्या वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळतात. या निमित्ताने आनंदी बेनने कंपनीचे मालक सवजी ढोलकिया आणि त्यांच्या पार्टनर्सची प्रशंसा केली. 

 

कर्मचा-याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला दिले 1 कोटी 
हरे कृष्ण डायमंड कपनीमध्ये 8 वर्ष काम केल्याने दिलीप कनु भाऊ सवालिया याचा नोकरी करत असताना मृत्यू झाला. दिलीपचे आई-वडील, पत्नी आणि मुलांचे भवितव्य चांगले असावे यासाठी आनंदी बेन पटेल यांच्या हस्ते त्या कर्मचा-याच्या पत्नीला एक कोटींचा चेक देण्यात आला. जवळपास 7 हजार कोटी रुपये रेवेन्यू असणा-या या कंपनीमध्ये 6 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...