आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरा सर्वात कणखर नैसर्गिक घटक नाही, जाणून घ्या सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यपणे असे मानले जाते की हिरा सर्वात कणखर, टणक नैसर्गिक घटक आहे. आजवर हेच शिकवले जाते आहे, परंतु ते खरे नाही. आता हिऱ्यापेक्षा ही कैक पटीने कणखर, टणक असा पदार्थ कार्बाइनचा शाेध लावण्यात आला आहे. संशाेधकांचा असा दावा आहे की, हीरा आणि ग्रॅफीन या पदार्थापेक्षाही ताे कठीण आहे. कार्बनच्या फिजिकल प्राेसेसने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उत्तर कॅराेलिना विद्यापीठातील संशाेधकांनी सांगितले की, आम्ही तर तांत्रिक प्रगती केली आहे. त्या क्यू-कार्बन नावाच्या नव्या पदार्थापासून बनवले जाऊ शकते. सामान्यपणे ही कार्बनची तिसरी अवस्था असते जी ग्रेफाइट आणि हिऱ्यापेक्षा निराळी आहे. 


संशाेधकांच्या मते कार्बाइनचे काही असामान्य गुण असू शकतात. परंतु त्यास अधिक प्रमाणात बनवायला हवे. हे संशाेधन 'एसीएस नॅनाे' नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. कार्बाइन खरे तर कार्बन परमाणूंच्या साखळीतील घटक आहे. जाे एक दुसऱ्यांना दाेन किंवा तीन रासायनिक तत्वांच्या माध्यमातून जाेडले गेलेले असते. ह्युस्टनच्या राइस विद्यापीठाचे बाेरिस याकाेब्सन यांनी या शाेधपत्रात म्हटले आहे की, खेचण्याच्या संदर्भात कार्बाइनची क्षमता सर्व ज्ञात पदार्थांमध्ये सर्वाधिक आहे. 


कार्बाइनमध्ये ग्रॅफीन आणि कार्बन ट्युबच्या तुलनेने दुप्पट आणि हिऱ्याच्या तुलनेत तिप्पट टणकपणा असताे. कार्बाइनला चुंबकीय सुपरकंडक्टरमध्ये परिवर्तीत केले जाऊ शकते. ग्रॅफीनची पातळ चादर ताेडण्यासाठी एका पेन्सिलच्या अग्रावर हत्तीएवढे बळ लावावे लागेल. यापूर्वी काही संशाेधकांनी कार्बाइन बनवण्यात यश मिळवले हाेते परंतु त्याचा कणखरपणा टिकाऊ नव्हता.

बातम्या आणखी आहेत...