आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dictator Kim Zheng Un Blows Out At Pikeito In Korea, Likely To Make Big Decision Soon

हुकूमशहा किम जाेंग उन कोरियातील ‘पाइकेतो’वर चौखूर उधळले, लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - उत्तर कोरियाचे नेते किम जाेंग उन यांनी कोरिया क्षेत्रातील सर्वोच्च शिखर पाइकेतोवर घोडेस्वारी केली. त्यांच्या या घोडेस्वारीकडे देशातील जनतेबरोबरच जगभराचे लक्ष लागले आहे. कारण उत्तर कोरियातील लोक माउंट पाइकेतोला अत्यंत पवित्र स्थान मानतात. किम उन व त्यांचे पूर्वज कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी ही शिखरभेट आवर्जून घेत. ही परंपरा १०९ वर्षांपासून सुरू आहे. हीच परंपरा पुढे नेताना किम जाेग उन बुधवारी चौखूर उधळले. 

सर्वात आधी १९१० मध्ये उन यांचे आजोबा व उत्तर कोरियाचे संस्थापक किम द्वितीय सुंग यांनी या शिखराला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी येथे जपानच्या विरोधात अड्डा तयार केला होता. सुंग यांनी १९४५ पर्यंत या शिखराला भेट दिली. किम परिवारातील लोक शिखरभेटीसाठी पांढऱ्या घोड्यावरून येतात. पांढरा घोडा शौर्याचे प्रतीक मानला जातो. किम यांचे पूर्वज जपानी शासकांसोबत लढाई करताना पांढऱ्या घोड्यावरून स्वारी करत. किम जाेग उन यांनी २०१८ मध्ये पाइकेतोला भेट दिली होती. त्यानंतर उत्तर कोरिया व अमेरिकेत कूटनीतिच्या पातळीवरील संबंध सुरू झाले होते. उन यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. किम उन पाइकेतो शिखरावरून परतताना म्हणाले, आम्हाला अमेरिकेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ही गोष्ट संतापात परिवर्तित झाली आहे. आम्ही सूड घेऊ. 

अमेरिकेवर राग का?
अमेरिकेने उत्तर कोरियावर १३ वर्षांत ११ वेळा निर्बंध लादले आहेत. याच महिन्यात दोन्ही देशांतील अणु कार्यक्रमावरील तडजोडीचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे किम उन अमेरिकेवर नाराज आहेत. त्यातूनच त्यांच्या तोंडी सूडाची भाषा आहे.

बातम्या आणखी आहेत...