आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • George Soros Narendra Modi | America George Soros On Narendra Modi Over Davos World Economic Forum

भारताला हिंदू राष्ट्र बनवू इच्छित आहेत मोदी; तानाशहांचा सामना करण्यासाठी उभा करणार 7100 कोटींचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावोस - येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये अमेरिकन अब्जाधीश आणि समाजसेवक जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. सोरोस यांनी सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रियत्व आणि देशभक्तीच्या व्याख्याच बदलण्यात आल्या आहेत. भारतात लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एक हिंदू राष्ट्र बनवू इच्छित आहेत. ते अर्धस्वायत्त मुस्लिम प्रांत काश्मीरात दंडेलशाही पावले उचलत आहेत. त्यांचा इशारा कलम 370 हटवणे आणि काश्मीरात निर्बंध लागू करण्याकडे होता. यासोबतच, सीएए आणि एनआरसीवर टीका करताना भारतात राहणाऱ्या लाखो मुस्लिमांवर त्यांचे नागरिकत्व हिरावले जाण्याचे संकट वाढले आहे.

जगात आता तानाशहांची सत्ता- ट्रम्प, पुतिनसह जिनपिंग यांच्यावरही टीका

सोरोस पुढे बोलताना म्हणाले, "सिविल सोसायटीमध्ये सलग घट दिसून येत आहे. मानवता कमी होताना दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाग्यावरच जगाची दिशा विसंबून आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला व्लादिमीर पुतिन, ट्रम्प आणि जिनपिंग तानाशहांसारखेच शासक आहेत. सत्ता काबिज करून ठेवणाऱ्या शासकांमध्ये वाढ होत आहे."

सोरोस यांच्या मते, "आपण सध्या इतिहासात बदलाच्या युगात वावरत आहोत. खुल्या समाजाची विचारधारा सध्या संकटात आहे. त्याहून मोठे आव्हान म्हणजे, हवामान बदल. आता माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रकल्प ओपन सोसायटी यूनिव्हर्सिटी नेटवर्क (ओएसयूएन) आहे. हे एक असे व्यासपीठ राहील, ज्यात जगातील सर्वच विद्यापीठाचे लोक शिकवू शकतील आणि स्वतः संशोधन सुद्धा करतील. ओएसयूएनसाठी मी एक अब्ज अमेरिकन डॉलर (जवळपास 7100 कोटी रुपये) गुंतवणार आहे."