• Home
  • News
  • Did Aishwarya Rai Bachchan calm down a furious Abhishek over Vivek Oberoi's offensive tweet?

Bollywood Special / विवेकच्या ट्विटला पाहून भडकला अभिषेक, चोख उत्तर देणार होता, पण ऐश्वर्याने त्याला थांबवले...

विवेकच्या ट्वीटला उत्तर देऊन त्याला अटेन्शन देण्याची गरज नसल्याचे ऐश्वर्या म्हणाली

दिव्य मराठी वेब टीम

May 22,2019 03:33:10 PM IST

बॉलीवूड डेस्क- विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या राय बच्चनबद्दल एक मीम आपल्या ट्विटर हंडलवर शेअर केला होता. या ट्वीटनंतर सगळीकडून विवेकवर टीका होत आहे. या मुद्द्यावर महिला आयोगापासून ते अनेक बॉलीवूड सेलिब्रेटीजंनी ट्विटरच्या माध्यमातून विवेकवर निशाणा साधला आहे. ट्वीट केल्यानंतर प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून विवेकने याबद्दल माफीदेखील मागितली, पण हे प्रकरण शांत होण्याचे नावच घेत नाहीये. या प्रकरणावर बच्चन कुटुंबाकडून अजून कोणतीच प्रतिक्रीया आलेली नाहीये, पण रिपोर्ट्सकडून कळाल्यानुसार त्यांना यामुळे खूप ठेच लागली आहे.


अभिषेक बच्चनला येत आहे राग
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक बच्चनला आपली पत्नी ऐश्वर्याच्या अपमानामुळे खूप राग आला आहे. नेहमी कूल मायंडेड अभिषेकने, विवेकला चोख उत्तर देण्याची तयारी केली होती, पण ऐश्वर्याने त्याला शांत राहण्यास सांगितले. ऐश्वर्या सध्या कान्समध्ये आहे, आणि तिला जेव्हा विवेकच्या याच ट्वीटबद्दल कळाले, तेव्हा तिने अभिषेकला शांत राहण्यास सांगितले आणि म्हणाली की, हे सगळं विवेक आपला आगामी चित्रपट "नरेंद्र मोदी बायोपिक"च्या पब्लिसिटीसाठी करत आहे. त्यासोबत या ट्वीटला उत्तर देऊन त्याला अटेन्शन देण्याची गरज नसल्याचे ऐश्वर्या म्हणाली.


काय आहे प्रकरण?
ट्विटरवर विविकने एक सटायर असलेला फोटो ट्वीट केला, ज्यात सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, तो स्वतः आणि आराध्याचे फोटोज आहेत. सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो सगळ्यात वर आहे. त्याला ओपिनियन पोलम्हणून दाखवण्यात आले आहे. त्यानंतर एक्झिट पोल म्हणून स्वतः विवेक आणि एश्वर्याचा फोटो आहे तर रिझल्ट म्हणून अभिशेक आणि एश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे. या फोटोनंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती.

X
COMMENT