आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरच्या चित्रपटात काम करणार होता 'सोनू के टीटू की स्वीटी'चा अॅक्टर, पण एका चुकीमुळे चित्रपटातून काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातून प्रसिध्द झालेला अभिनेता कार्तिक आर्यन हा करण जोहरसोबत एका चित्रपटात काम करणार होता. आता ओव्हर एक्सायटेड कार्तिकने स्वतःच्या चित्रपटाची अनाउंसमेंट केली असे वृत्त आहे. हे करण जोहरला आवडले नाही आणि त्याने कार्तिकऐवजी दिलजीत दोसांजला चित्रपटात घेतले आहे. 

 

कार्तिकने अशी व्यक्त केली करणवरील नाराजी
सूत्रांनुसार, करण जोहर आणि 'कॉफी विद करण'च्या क्रिएटिव्ह टीमने कार्तिकला शोसाठी अप्रोच केले होते. सामान्यतः करण इंडस्ट्रीमधील मित्रांना शोमध्ये घेऊन येतो, पण नवीन अॅक्टर्सला संधी द्यावे असे चॅनलला वाटते. कार्तिक आर्यनने यावर्षी 'सोनू के टीटू की स्वीटी' हा हिट चित्रपट केला यामुळे त्याची प्रसिध्दी आता वाढली आहे. टीमला वाटले की, कार्तिक शोसाठी एक परफेक्ट चॉइस असेल. करण जोहरला वाटते की, कार्तिक आणि विक्की कौशलने एकत्र यावे. पण कार्तिकला विक्की कौशलसोबत यायचे नाही. 

 

करणच्या शोमध्ये न येण्यामागे सांगितले असे कारण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकला या शोमध्ये विक्की कौशलपेक्षा मोठ्या स्टारसोबत यायचे होते. यामुळे टीमने दूसरे ऑप्शन सर्च केले आणि आयुष्मान खुरानाला अप्रोच केले. आयुष्मान शोमध्ये येण्यास तयार झाला तेव्हा विक्की कौशल आणि आयुष्मानसोबत शो शूट करण्यात आला. कार्तिक करणच्या शोमध्ये न येण्याचे वेगळे कारण सांगत असला तरी त्याला अजूनही करणविषयी राग आहे. यामुळेच त्याने नकार दिला आहे. कार्तिक दिनेश विजनच्या 'लुका छुपी' मध्ये काम करत आहे. यामध्ये त्याच्यासोबत कृती सेनन आहे. यासोबतच त्याच्याजवळ 'किरिक पार्टी'चा रीमेकही आहे. यामध्ये जॅकलीन फर्नांडीज काम करतेय. 

बातम्या आणखी आहेत...