आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रायव्हेट फोटोज लीक/ अक्षरा हासनचा एक्स-बॉयफ्रेंड तनुज विरमानीवर संशय, स्वतः दिले होतो फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क. सुपरस्टार कमल हासनची छाकटी मुलगी अक्षरा हासनचे काही प्रायव्हेट फोटोज सोशल मीडियावर लीक झाले होते. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. वर्सोवा(मुंबई) पोलिस आता अक्षराचा बॉयफ्रेंड राहिलेला अॅक्टर तनुज विरमानीची चौकशी करणार आहेत. सूत्रांनुसार अक्षराने तनुजसोबत रिलेशनशीपमध्ये राहत असताना 2016 मध्ये हे फोटोज त्याच्यासोबत शेअर केले होते. वर्सोवा पोलिसही म्हणाले की, अक्षराने हे फोटो तनुजसोबत शेअर केले होते. 


आता तनुजजवळ फोटोज नाहीत 
प्रायव्हेट फोटोज लीक झाल्यानंतर अक्षराने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. हे फोटोज कुणी लीक केले याविषयी तिला काहीच माहिती नाही असे त्यावेळी ती म्हणाली होती. आता हे फोटो तनुजनेच लीक केले आहेत? की अक्षरा किंवा तनुजचे अकाउंट हॅक झाले आहे? हे दोन मोठे प्रश्न आहेत. हे जाणून घेण्यासाठी पोलिस चौकशी करणार आहेत. सूत्रांनुसार सध्या तनुजजवळ हे फोटोज नाही. तनुजच्या पीआरने एका स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, तनुज अजूनही अक्षराचा चांगला मित्र आहे. अशावेळी तनुज सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांना पुर्ण सपोर्ट करेल. 

 

2013 मध्ये तनुजने केला होता बॉलिवूड डेब्यू 
तनुजने 2013 मध्ये लव्ह यू सोनियोमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्याने सनी लियोनीसोबत वन नाइट स्टँड(2016) मध्येही काम केले आहे. यासोबतच तो इनसाइड एज(2017) या वेबसीरीजमध्येही प्रमुख भूमिकेत दिसला आहे. महत्त्वाची गोष्टी म्हणजे तनुजी आई रती अग्नीहोत्री आणि अक्षराचे वडील कलम हासन दोघांनीहीह 1981 मध्ये एक-दूजे के लिएमधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 
 

 

बातम्या आणखी आहेत...