आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमधील वाहनांसाठी नेपाळमधून पेट्रोलची तस्करी, आश्चर्य वाटले ना! पण असे घडते आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - नेपाळच्या तेलावर बिहारमधील सीमावर्ती जिल्ह्यातील वाहने चालतात. आश्चर्य वाटले ना! पण असे प्रथमच घडते आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत चालल्याने नेपाळमधून डिझेल व पेट्रोलची तस्करी सुरू आहे.

 

यातील महत्त्वाचे कारण म्हणजे दोन्ही देशांत तेलाच्या किमतीत २० टक्के तफावत आहे. सोमवारी बिहारमध्ये पेट्रोलची किंमत ८८.९३ रुपये प्रतिलिटर होती, तर नेपाळमध्ये पेट्रोलचे भाव ७१ रुपये (भारतीय चलनात) प्रतिलिटर आहेत. डिझेलचे दर ७९.७३ प्रतिलिटर आहेत.

 

नेपाळमध्ये ६३ रुपये लिटर आहेत. या परिस्थितीत नेपाळच्या सीमावर्ती भागात पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी दिसते आहे.  नेपाळच्या बारापरसा जिल्ह्यात सुमारे ११४ पंपांपैकी सीमावर्ती भागातील २० पंपांवर बिहारमधील लोकांची दररोज गर्दी दिसून येत आहे. हे तर केवळ एक उदाहरण आहे.

 

सीतामढी, पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मधुबनीपासून उत्तर प्रदेशातील सीमेपर्यंत हीच परिस्थिती आहे. छोट गॅलन अथवा कॅनमधून तसेच कंटेनरसुद्धा राज्यातील सीमावर्ती भागात येत आहेत. त्याचबरोबर तस्करांशी संबंध असलेले काही पुरवठादार त्यांची वाहने नेपाळच्या पेट्रोल पंपांवर  भरून घेतात.

 

तस्करांची ‘चांदी’ व लाेकांचाही फायदा  
इंधनाच्या तस्करीत अनेक लहान-मोठे सिंडिकेट सक्रिय आहेत. याचा एक खास आर्थिक फार्म्युला आहे. नेपाळमधून अाणलेल्या डिझेलवर प्रतिलिटर ५ ते ६ रुपयांच्या कमाईवर इंधन विकतात. परंतु पेट्रोलसाठी एक लिटरमागे दहा ते ११ रुपये जास्त घेतले जातात. यात तस्करांची चांदी तर होतेच, पण लोकांचाही फायदा होतो. त्यामुळे इंधनाच्या या व्यवसायात तेजी आली आहे.

 

पेट्राेल-डिझेल तस्करी पकडली
इंधनांची वाढती तस्करी पाहून भारत-नेपाळ सीमेवर पहारा देणाऱ्या सशस्त्र सीमादलाच्या (एसएसबी) तुकडीने सीमेवर गस्त वाढवली आहे. नुकत्याच पेट्रोल-डिझेलच्या तस्करीच्या अनेक कन्साइनमेंट पकडण्यात आल्या आहेत. नेपाळची सीमा खुली असून विशेष सुविधा देण्यात आल्याने सीमावर्ती भागातील नागरिक दुचाकी व वाहने घेऊन सीमेपलीकडे सहजपणे जातात.

 

सीमेवरील पंंपांवर २० टक्के विक्री वाढली
तस्करीशिवाय बिहारच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यात राहणारे नागरिक आणि वाहतूक व्यावसायिक काही किलोमीटर दूर असलेल्या नेपाळमध्ये त्यांच्या दुचाकी, कार तसेच मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या टाक्या फुल्ल करून घेतात. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागातील पेट्रोल पंपांवरील विक्री १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी नेपाळमध्ये झालेल्या आंदोलनात बिहारमधून पेट्रोल-डिझेलचा चाेरट्या मार्गाने पुरवठा सुरू होता.

 

नेपाळच्या सीमावर्ती भागात वाहनातून अथवा  गॅलन तसेच कॅनमधून  वाहने अथवा कॅन तसेच गॅलन भरून डिझेल-पेट्रोल विकण्याचे प्रयत्न  होत आहेत. सीमेवर चालणारी अवैध कामे राेखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  
- फ्रंटियर हेडक्वार्टर (पाटणा), एसएसबी

 

बातम्या आणखी आहेत...