15 दिवस आधीच मिळतात हृदयविकाराचा झटका येण्याचे 6 संकेत

हार्ट अॅटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय आहे फरक? 

दिव्य मराठी

Apr 19,2019 12:04:00 AM IST

असे मानले जाते की, हृदय निकामी झाल्यावर हृदय काम करणे बंद करते. मात्र, हे पूर्ण सत्य नाही. हृदयविकाराचा झटका आल्यावर हृदयाची ब्लड पंप करण्याची क्षमता कमजोर होते. म्हणजे यात रुग्णाचा लगेच मृत्यू होत नाही. त्याच्या जीविताला असलेला धोका वाढतो. अशा वेळी काळजी घेणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला हृदयविकाराचे संकेत माहिती असावेत.


बॉम्बे हॉस्पिटलचे कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. इद्रिस खान सांगतात की, जास्तीत जास्त हार्ट फेल्युअरच्या केसेसमध्ये हार्ट फेल्युअरचे संकेत १५ दिवस आधीच मिळतात. जर वेळेअगोदर हे ओळखून इलाज सुरू केला तर अनेक धोके टाळता येऊ शकतात आणि प्राणही वाचवता येतो.

हार्ट अॅटॅक
आर्टरीज ब्लॉक झाल्यामुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हा झटका किती मोठा किंवा गंभीर आहे हे आर्टरीजमधील ब्लॉकेजवर अवलंबून असते. जर ब्लॉकेज जास्त असतील किंवा वेळेअगोदर ब्लॉकेज दूर केले नाहीत तर हृदय काम करणे बंद करते. यामध्ये रुग्णाचा काही वेळातच मृत्यू होऊ शकतो.


कार्डियाक अरेस्ट
हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा ते कार्डियाक अरेस्ट असते. काही इलेक्ट्रिकल तरंग या हृदयाच्या ठोक्यांसाठी जबाबदार असतात. जेव्हा या इलेक्ट्रिकल तरंग बंद होतात तेव्हा हृदयाचे ठोके पडणे बंद होते. यामधील जास्तीत जास्त प्रकरणात रुग्णाचा मृत्यू होतो, तर काही प्रकरणांत हृदयाला शॉक दिल्यानंतर ठोके पुन्हा सुरू होतात.


हार्ट फेल्युअर
हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाची पंप करण्याची क्षमता कमजोर होते. म्हणजे यामध्ये रुग्णाचा अचानक मृत्यू होत नाही, परंतु वेळेत उपचार करणे आवश्यक असते.


हृदयविकाराचा झटका येण्याचे संकेत
विनाकारण थकवा
का?
: हृदयविकाराचा झटका आल्यावर रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते. अशा वेळी विनाकारण थकवा आणि कमजोरी जाणवते.


हार्ट बीट वाढणे
का
? : हृदयाला रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा न झाल्याने हार्ट बीट वाढतात.


भूक न लागणे
का?
: हृदयाद्वारे योग्य पद्धतीने ब्लड पम्पिंग न झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताचा योग्य प्रकारे पुरवठा होऊ शकत नाही. अशा वेळी मेंदू भूक लागण्याचा संकेत देऊ शकत नाही.


सूज येणे
का?
: शरीरामध्ये योग्य प्रकारे रक्त पुरवठा न झाल्यामुळे चेहरा किंवा पायावर सूज येते.


श्वास घेण्यास त्रास
का?
: शरीराचा रक्त प्रवाह बिघडल्यामुळे फुप्फुसांमध्ये पाणी भरते. अशा वेळी श्वास घेण्यास त्रास होतो.


कफ तयार होणे
का?
: फुप्फुसांमध्ये पाणी भरल्यामुळे कफ आणि खोकल्याची समस्या हार्ट फेल्युअरचा संकेत असू शकतो.

X