आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संदीप शिंदे
माढा- महागात महाग लग्नपत्रिका बनवुन घेऊन त्या वाटणे सध्या प्रतिष्टेचा विषय बनलेला आहे. विविध प्रकारच्या पत्रिका बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. मात्र माढा शहरामध्ये 9 फेब्रुवारी रोजी होणा-या लग्नाची छापलेली पत्रिका चांगलीच चर्चेत आली आहे. या 44 पानी लग्नपत्रिकेवर थोर महापुरुषांच्या प्रतिमा व विचार,प्रबोधनात्मक लेखमाला,यासह अन्य
वैचारिक पातळीने नटलेली पंचफुला प्रकाशन ओरंगाबाद यानी बनविलेली ही पत्रिका घराघरात संग्रही राहणारी अशीच आहे. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती खा. संभाजीराजे भोसले व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर;इतिहास संशोधक प्रा.श्रीमंत कोकाटे यांनी या पत्रिकेचे कौतुक करुन विवाह सोहळ्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व थोर महापुरुषांच्या प्रतिमा मुखपृष्टावर छापण्यात आले असुन यातून त्यांनी सर्वधर्म समभाव समाजात राखण्याचा संदेश दिला आहे. मराठा सेवा संघाचे दत्ताजी शिंदे व माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली ही पुस्तकरुपी लग्नपत्रिका प्रथमच पहावयास मिळाल्याने ही पत्रिका सोशलमिडीयावर सर्वत्र व्हायरल होते आहे.
धार्मिक प्रथेला फाटा देऊन होणार विवाह
जयदीप व सुप्रिया यांचा विवाह हा वर्षानुवर्षे चालत आलेल्या धार्मिक प्रथेला व जुन्या कर्मकांडाला नाकारुन होणार आहे. विवाह हा सर्व महापुरुषांच्या प्रतिमापुजनाने व तुकाराम महाराजांची अभंगवाणीचे वाचन करुन व सामाजिक संस्थेला निधी देऊन व अन्य सामाजिक उपक्रम राबवुन पार पडणार आहे.
अशी आहे लग्न पत्रिका
44 पानी पुस्तकरुपी लग्नपत्रिकेत सुरुवातीस जिजाऊवंदना,समाजातील सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक हा विशेष लेख,शिवविवाह संकल्पना माहिती,प्रख्यात लेखक प्रा.अशोक बनसोडे यांचा कुळवाडी भुषण शिवराय,तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग क्षेत्रा येण्या बाबतचा लेख,जन्मदात्या पित्याचे महात्म्य सांगणारा प्रा.डाॅ.दिलीप धानके यांची कविता,मोहन जाधव यांचा भारतरत्न डाॅ बाबासाहेब आबेंडकर आणि मराठा समाज यासह अन्य विषयावर विचारवंताचे लेख देऊन वैचारिक प्रबोधन करण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.