आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंग सैनिकाने बसल्या-बसल्या उचलले तब्बल 505 किलो वजन, गिनीज बुकमध्ये नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटेन(लंडन)- येथील एका अपंग सैनिकाने बसल्या जागेवरून 505 किलो वजन उचलून जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सैनिकाचे नाव मार्टिन टॉय असून त्याच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. हे यश संपादन केल्यानंतर मार्टीन म्हणाले की, अपंग व्यक्ती कमजोर नसून ते कोणतेही काम करू शकतात. फक्त त्यांच्या काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते.

 

हा कार्यक्रम 6 मे रोजी इंग्लंडच्या व्राक्सल गावामध्ये आयोजित केला होता. स्थानीक मीडियानुसार, मार्टिन ब्रिटिश आर्मीमध्ये सैनिक होते, या दरम्यान त्यांनी अनेक युद्ध लढले. मार्टिन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी आर्मीमध्ये प्रवेश केला होता. नोकरी दरम्यान ते इराक, लेबनान आणि साइप्रसमध्ये जावे लागले. त्यानंतर ऑगस्ट 2009 मध्ये त्यांची पोस्टिंग अफगानिस्तानमध्ये झाली, जिथे काबुलमध्ये एका बॉम्बरने त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये मार्टीनला आपला एक पाय गमवावा लागला.

बातम्या आणखी आहेत...