आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानसोबत काम करणे स्वप्नासारखे असेल : दिगांगना सूर्यवंशी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिअॅलिटी शो 'बिग बॉस'ची एक्स कंटेंस्टेंट राहिलेली अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी बऱ्याच दिवसांपासून टीव्हीवर दिसली नाही. चित्रपटासाठी तिने टीव्ही सोडला आहे. तीन वर्षांच्या गॅपनंतर दिगांगना दोन 'जलेबी' आणि 'फ्रायडे'मधून बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होतील. या मुलाखतीत दिगांगनाने बॉलीवूड आणि सलमान खानसोबत आपल्या नात्याविषयी सांगितले.... 

 

तुझे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. स्वत:शीच स्पर्धा करत आहेस का ? 
सिरियसली, 'जलेबी' आणि 'फ्रायडे' एकाच दिवशी रिलीज होत आहेत हे ऐकून मीदेखील शॉक्ड झाले. काय बोलावे आणि काय करावे कळलेच नाही. हे योग्य आहे की नाही माहीत नाही, मात्र एखाद्या चित्रपटाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होईल. यापूर्वी कधीच असे झाले नाही. एखाद्या नवोदित कलावंतांचे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी कधी आले नसल्याचे लोकांनी सांगितले. असे व्हायला नको होते, मात्र दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय करावा हीच अपेक्षा. 

 

दोन्ही चित्रपटांच्या भूमिकेत समानता आहे का ? 
नाही, 'फ्रायडे'मध्ये कॉमेडी करताना दिसणार आहे. गोविंदा आणि वरुण शर्मा स्टारर हा एक मजेदार चित्रपट आहे. तो एका सत्य घटनेवर आधारित आहे. दुसरीकडे महेश भटचा 'जलेबी' एक भावुक चित्रपट आहे. यात मुख्य भूमिकेतील नायकाच्या प्रेयशीची भूमिका करणार आहे. दोन्ही चित्रपटांत अंतर आहे. 

 

कोणती भूमिका जास्त आवडली ? 
खरं तर मी थोडी वेगळी आहे. मला कोणतेच पात्र जवळचे वाटत नाही. कारण आपण जेव्हा आनंदी, दु:ख किंवा रागात असतो तेव्हा आपल्या भावना वेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतो. त्यामुळे मीदेखील आपल्या पात्राला आपल्या पद्धतीने व्यक्त करत आहे. प्रेक्षकांनादेखील चित्रपटात दिगांगना सूर्यवंशी नव्हे, तर चित्रपटातील पात्रच दिसले पाहिजे. 

 

टीव्हीवर परतशील का ? 
मी टीव्हीवर प्रेम करते. टीव्हीविषयी माझ्या मनात किती आदर आहे मला ओळखणाऱ्या लोकांना ते माहीतच आहे. येथे आपल्याला 14 ते 15 तास काम करावे लागते. तुमचे पूर्ण आयुष्य सेटच्या आवतीभोवतीच फिरत असते. 13 ते 14 वर्षांपासून हेच करत आले आहे. आता दुसरीकडे फोकस करू इच्छित आहे. लोक मला जोपर्यंत पाहतील तोपर्यंत चित्रपट करत राहील. 

 

बिग बॉसनंतर सलमान खानच्या संपर्कात होतीस का ? 
हो, ते माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यासोबत काम करणे स्वप्नासारखे आहे. मात्र मला लाँच करा, किंवा माझी बाजू घ्या, असं मी सलमानला कधीच म्हटलं नाही. माझ्यायोग्य काही काम असेल तर ते मला नक्कीच बोलावतील. 

बातम्या आणखी आहेत...