आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणला जुन्या वाड्यात गुप्तधनासाठी खाेदकाम; ४ मांत्रिकांसह ११ अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - पैठण येथील जुन्या काला पहाड भागातील पडक्या दगडी वाड्यात शनी अमावास्येला गुप्तधनासाठी खोदकाम करत असलेल्या अकरा जणांना पैठण पोलिसांनी अटक केली. यात मुंबई येथील एक व अकोला येथील ३ अशा चार मांत्रिकांचा समावेश आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता पैठण पोलिसांनी ही कारवाई केली.
नेहरू चौक परिसरातील काळा पहाड भागात एक जुना पडका वाडा असून या वाड्यात कुणीही राहत नाही. अनेक वर्षांपासून ताे बंद आहे. या वाड्यात गुप्तधन काढण्यासाठी काही लोक मांत्रिकासाेबत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे पोलिसांनी रविवारी सकाळी ११ वाजता छापा टाकला. या वाड्यात खोदकाम करून लिंबू, कापूरवडी, गोमूत्र, अगरबत्ती, अत्तर, पांढऱ्या रंगाचे दोरा बंडल आदी पूजेच्या वस्तूंसाेबतच गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नातील आरोपींंना पोलिसांनी ताब्यात घेतले. शनी अमावास्येमुळे हे आरोपी तयारीत होते. 
 

यांना झाली अटक, काही मांत्रिकांसह इतरांचा समावेश
विजयकुमार  शिसोदे (६२, ढाकेफळ), संजय शिसोदे ( ५२, यशवंतनगर), अजय करकोटक (४७, परदेशीपुरा, पैठण), नारायण किसन फसाडे ( ४७, यशवंतनगर, पैठण), अशोक बोंबले (५२, जुना नगररोड, पैठण), विनायक शिवराम आयरे (४९, श्रीकांत पालेकर मार्ग, चिराबाजार मुंबई), विलास  शिंदे (२८ संतनगर, पैठण), शिवाजी शिंदे (५० संतनगर, पैठण),  प्रवीण नंदागवळी (५५, डापकी रोड, रावनगर, अकोला),  ज्ञानेश्वर खोले (२८ करोडी, ता. अकोट, जि. अकोला), दत्ता साबळे (२६, तरोडा, ता. अकोट).

बातम्या आणखी आहेत...