आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणात खोदताना अचानक सापडल्या रहस्यमयी पायऱ्या, जे दिसले ते पाहून विश्वासच बसणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका. एरिजोना येथील टकसनमध्ये राहणा-या जॉन रिम्सने एकता अचानक आपल्या अंगणात खोदकाम सुरु केले. हे पाहून त्यांचे शेजारी त्यांना पागल म्हणत होते. परंतू नंतर जे काही सत्य समोर आले. ते पाहून सर्वच चकीत झाले. जॉनने 1960 मध्ये हे घर एका व्यक्तीकडून खरेदी केले होते. एकदा त्याला त्या घराचा जुना नकाशा मिळाला. नकाशा पाहून जॉन चकीत झाला. कारण त्यामध्ये अजून एक खोली बनवलेली होती. परंतू वास्तवात ती नव्हती. ही खोली शोधण्यासाठी जॉनने आपल्या अंगणात खोदकाम करणे सुरु केले. 


ली मेटल डिटेक्टरची घेतली मदत 
- जॉनने सर्वात पहिले मेटल डिटेक्टरची मदत घेतली. त्यांनी विचार केला की, जर अजून एक खोली असेल तर त्यामध्ये अवश्य लोखंडांचा वापर केलेला असेल. त्यांनी शोध सुरु केला होता. तेव्हाच मेटल डिटेक्टरने अंगणाच्या एका बाजूला इशारा केला. जॉनने उशीर न करता खोदकाम सुरु केले. काही फूट खाली त्यांना एक गोलाकार झाकन दिसले. 
- हे झाकण खुप मजबूत आणि जड होते. यामुळे जॉनने हे उघडण्यासाठी मित्रांना बोलावले. झाकण उघडताच हैराण करणारे दृष्य दिसले. गार्डनच्या खाली पाय-या होत्या. जॉन एक्सायडेट होते, यासोबतच ते घाबरलेलेले होते. खाली काय आहे हे त्यांना पाहायचे होते.


नंतर त्यांनी स्वच्छता सुरु केली. 
- पाय-या खुप जुन्या होत्या. त्यावर गंज चढला होता आणि खालील बाजूला माती होती. जॉनने काही लोकांच्या मदतीने याची स्वच्छता करणे सुरु केली. पाय-या स्वच्छ करुन सर्वात पहिले जॉन खाली गेला. तिथले दृष्य पाहून जॉन चकीत झाले. ही एक मोठी खोली होती, जी पुर्णपणे लोखंडाने बनलेली होती. 

 

अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या वस्तू 
- जॉनला या ठिकाणी अमेरिकी सेनेच्या उपयोगात येणा-या अनेक वस्तू सापडल्या. त्यांनी थोडी माहिती घेतल्यावर कळाले की, दुस-या महायुध्दाच्या काळात अनेक ठिकाणी असे शेल्टर होम बनवण्यात आले होते. हे एवढे मजबूत होते की, परमाणु हल्ल्यादरम्यान यामध्ये सुरक्षित राहता येऊ शकले असते. 


नंतर दिसला एक हॉल 
जॉनची नजर लोखंडाने बनलेल्या एका हॉलवर गेली. हा हॉल एका पाइपने जोडलेला होता. जॉनला समजले की, हे बाहेरची ताजी हवा आतमध्ये आणण्यासाठी असेल. कारण याशिवाय येथे जीव गुदमरला असता. 


सुरु केले दुरुस्तीचे काम 
जॉन आपल्या या शोधामुळे खुप आनंदी झाले आणि त्यांने हे ठिकाण रिनोवेट करण्याचा निर्णय घेतला. जॉनने बरेच पैसे खर्च करुन याची दुरुस्ती केली. जॉन म्हणाले की, ते लवकरच या जागेचा योग्य उपयोग करतील. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...