आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजीटल भिकारी : क्यूआर कोडद्वारे मागतात भीक, बँकखाते किंवा मोबाइलची आवश्यकता नाही; महिन्याकाठी कमवतात जवळपास 2 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - आजच्या डिजीटल युगात चीनमधील भिकारी सुद्धा डिजीटल झाले आहेत. ते भीक मागण्यसाठी क्यूआर कोड आणि ई-वॉलेटचा वापर करत आहेत. यामुळे भिकारी दर आठवड्याला 45 हजार रुपयांची कमाई करत आहेत. येथील अनेक ई-वॉलेट कंपन्यानी भिकाऱ्यांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. क्यूआर कोड स्कॅन करताच भीक देणाऱ्याचा डेटा या कंपन्याकडे पोहोचतो. या कंपन्या या डेटाची विक्री करून चांगले पैसा गोळा करतात. भिकाऱ्यांना क्यूआर कोड देण्यात अलीबाबाच्या Ali Pay आणि We Chat यांसारख्या मोठ्या ई-वॉलेट कंपन्यांचा सहभाग आहे. 


क्यूआर कोड वापरणाऱ्या भिकाऱ्यांची संख्या पर्यटनस्थळांवर अधिक 
चीनचे पर्यटन स्थळे आणि सब-वे स्टेशनच्या आसपास डिजीटल पेमेंट किंवा क्यूआर कोड सिस्टम असलेले असे भिकारी दिसून येतात. भिकाऱ्यांना सहज पैसे मिळावेत आणि कोणी सुटे पैसे नसल्याचा बहाणा करू नये या मोठ्या कारणांमुळे चीनमधील भिकारी डिजीटल होत आहेत. ज्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत ते देखील क्यूआर कोड स्कॅन करून भिकाऱ्यांची मदत करू शकतात. 


भीक ने देता फक्त कोड स्कॅन केल्यानंतरही भिकाऱ्यांनी काहीतरी मिळतेच
भिकारी क्यूआरचे प्रिंटआउट दाखवून अलीबाबा ग्रुपच्या Ali Pay किंवा टॅन्सेंटच्या we chat वॉलेटच्या माध्यमातूनच भीक देण्याची विनंती करतात. स्थानिक चॅनल्सनुसार ही व्यवस्था एक प्रकाराचा बाजार झाला आहे. भिकाऱ्यांकडे अनेक प्रकारचे स्पॉन्सर्ड कोड आलेले आहेत. भिकाऱ्यांना भीक न देता फक्त स्पॉन्सर्ड क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर भिकाऱ्यांना काहीतरी रक्कम मिळतेच. 

 

भिकारी क्यूआर कोडच्या मदतीने सामानाची करतात खरेदी 
चीनमध्ये भिकाऱ्यांना आपले बँक खाते चालविण्यासाठी मोबाइल फोनची आवश्यकता नाही. क्यूआर कोडद्वारे मिळालेली रक्कम थेट त्यांच्या डिजीटल वॉलेटमध्ये जाते. या क्यूआर शीटच्या माध्यमातून ते किराणा दुकान किंवा इतर दुकानांतून सामानाची खरेदी करतात. या व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्यूआर चालविण्यासाठी बँक खात्याची आवश्यकता भासत नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...