आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-काॅमर्ससाठी डिजिटल माॅल, जानेवारी २०२० पर्यंत तयार हाेणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - डिजिटल खरेदी-विक्री जसजशी अंगवळणी पडत अाहे, तसे ई-काॅमर्समध्ये बदल घडवत ग्राहकांच्या खरेदीचा अनुभव पूर्णपणे बदलला अाहे. असे असले तरी, हे रिटलर्स अाणि खरेदीदार दाेन्हींसाठी अाव्हान अाहे. उदाहरण द्यावयाचे झाल्यास, अग्रणी अाॅनलाइन प्लॅटफाॅर्म माेठमाेठे कमिशन वसूल करत अाहेत. यानंतर राेकड देयकाच्या समायाेजनातही िवलंब करत अाहेत. हे सर्व रिटेलरच्या अाॅनलाइन प्रक्रियेत त्रास निर्माण करणारे आहे. हे निष्पक्ष बाजाराचा मूळ उद्देश नष्ट करतो. अशा पद्धतीने उत्पादनातील बनवेगिरीसारखे मुद्दे खरेदीदारांचा मूड खराब करतात आणि त्यांना आपल्या आवडीच्या ब्रँड्सपासून दूरही करतात. अशा स्थितीत गेम-चेंगिंग कॉन्सेप्टसारख्या डिजिटल मॉल ऑफ एशिया(डीएम)चे छायाचित्र समोर येते.

 

डिजिटल मॉल आणि डिजिटल शॉप्सचे अनोखे मिश्रण डीएमए :


योकेशिया मॉलच्या संस्थापकांची कल्पना असलेल्या डिजिटल मॉल आणि डिजिटल शॉप्सचे अनोखे मिश्रण आहे डीएमए. त्याचा उद्देश ग्राहकांना विविध रिटेल आऊटलेट्सकडून शॉपिंग करणे, हायपरमार्केटपर्यंत पोहोच प्राप्त करणे, भाेजनाची व्यवस्था करणे, चित्रपट पाहणे आणि आणखी काही सेवेसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे आहे. ही नव्या युगाची संकल्पना असून ती शून्य-कमिशन मॉडेलवर चालवण्यासाठी डिझाइन केले आहे. हे रिटेलर्स आणि विक्रेत्यांना त्यांचे आवडीचे शहर, टॉवर आणि फ्लोअरवर एक दुकान भाड्याने घेण्यावर सक्षम करते. ते केवळ आपल्या आफलाइन स्टोअरला क्रांतिकारक ई-कॉमर्स पोर्टलवर एकीकृत करण्यात सक्षम राहतील, शिवाय त्यांना आपल्या शहरात एखाद्या उत्पादन श्रेणी किंवा ब्रँडला विकण्यासाठी विशेष अधिकारही दिला जाईल. ही सुविधा रिटेलर्ससाठी एक मोठ्या दिलाशाच्या रूपात येईल. कारण, ही कृत्रिम हायपर-स्पर्धा समाप्त करण्यास मदत करेल. ही एक सामान्य चिंता असून जी सध्या विविध ई-कॉमर्स पोर्टल्सवर दिसते.

रिटेलर्सना या पोर्टलवर काम करण्यासाठी १० हजार रु. भाडे द्यावे लागेल :


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रिटलर्सना या पोर्टलवर काम करण्यासाठी केवळ १० हजार रुपये भाडे द्यावे लागेल आणि ते  कोणतेही अतिरिक्त कमिशन देण्यापासून सुटका करू शकतील. बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या ५-३५% शुल्क वसूल करतात. यामुळे रिटेलर शक्यतो आपली उत्पादने कमी किमतीत विकतील आणि अशा प्रकारे त्यांच्या नफ्यात सुधारणा होईल. ही खरेदीदारीच्या संपूर्ण प्रक्रियेस आणखी स्वस्त आणि अंतिम ग्राहकांसाठी स्वागतयोग्य बनवेल. अशा पद्धतीने खरेदीदारांना प्राप्त केल्यानंतर उत्पादनाची संपूर्ण तपासणी करण्याची परवागनी मिळेल, त्यामुळे मोठ्या प्रमाणातील बनावटपणाचा मुद्दा समाप्त होऊ शकतो आणि ग्राहक अंतिम देयक पूर्ण समाधान झाल्यावरच करू शकतील.जानेवारी २०२० पर्यंत तयार होण्याची आशा

डिजिटल मॉल ऑफ एशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ऋषभ मेहरा म्हणाले, आम्ही जानेवारी २०२० मध्ये तयार होण्यासाठी खूप उत्साहित आहोत. अत्याधुनिक अाणि पहिल्यांदाच देणाऱ्या सुविधा व सवलतीसोबत आम्ही भारतीय ई-कॉमर्स स्पेसमध्ये बदल आणू. वास्तव तर हे आहे की, डीएमएसारखी संकल्पना आपल्या देशातील बहुतांश रिटेलर्स आणि खरेदीदारांसाठी एक आवश्यकता आहे, जी सध्या उत्पादनातील बनावटपणा आणि कृत्रिम स्पर्धेसारख्या चिंतांचा सामना करत आहे. आपला उद्देश अनुक्रमे अशा आव्हानांचे समाधान करणे आणि रिटेलर्स व खरेदीदारांच्या खरेदीच्या प्रक्रियेस सुुरक्षित, समाधानकारक आणि विना त्रासाची करणे हा आहे.

बातम्या आणखी आहेत...