आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Digital Payments Platform PhonePe Digital ATM Feature Launched Today Latest News And Updates On PhonePe UPI ATM Service

फोनपे कंपनीने लॉन्च केले नवीन ATM फीचर, जवळच्या स्टोरवरुव 1 हजार रुपयांपर्यंतची कॅश काढू शकता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजर एक हजार रुपयांपर्यंतची रोकड काढू शकतात

गॅजेट डेस्क- डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपेने गुरुवारी एक नवीन फोनपे एटीएम फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या माध्यमातून फोनपे एटीएमची सुविधा पुरवणाऱ्या मर्चेंट पार्टनरवर जाउन यूजर एक हजार रुपयांपर्यंतची रोकड काढू शकतात. सध्या कंपनीने याला पायलट प्रोजेक्ट अंतर्गत लॉन्च केले आहे. सुरुवातीला ही सुविधा दिल्ली-एनसीआरमध्ये दिली जाणार आहे.

कंपनीचे ऑफलाइन बिजनेस डेव्हलपमेंट हेड विवेक लोकैब यांनी सांगितले की, यूजर्सना रोकड हवी असल्याच एटीएमला जाण्याऐवजी फोनपे एटीएमवरुन पैसे मिळतील. यासाठी यूजर्सला फक्त त्या स्टोरवर जाऊन ऑनलाइन पेमेंट करावी लागेल, आणि 1 हजार रुपयांपर्यंतची कॅश मिळेल. या सुविधेसाठी मर्चेंट आणि कस्टमर अशा कोणाकडूनच चार्ज घेतला नाही जाणार. 

बातम्या आणखी आहेत...