आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या 'मन की बात'साठी उस्मानाबादमधील डिजिटल वाहने, प्रत्येक वाहनावर एलईडी स्क्रीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू होईपर्यंत भाजपच्या वतीने राज्यात सर्वत्र 'भारत के मन की बात, मोदी के साथ', हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी डिजिटल वाहनांच्या माध्यमातून गावागावात संपर्क साधण्यात येणार आहे. या अभियानासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल वाहनांची बांधणी उस्मानाबाद शहरात करण्यात आली आहे. एलईडी स्क्रीनसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा डायस वाहनांवर लावण्यात आला आहे. 
आतापर्यंत शासनाने कोणत्या योजना राबवल्या, त्याची परिणामता कशी आहे, यासंदर्भात माहिती देण्यासाठी व लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात 'भारत के मन की बात, मोदी के साथ' अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये डिजिटल वाहन पाठवण्यात येणार आहे. अशा डिजिटल वाहनांची बांधणी उस्मानाबाद येथील प्रवीण माळी यांनी केली आहे. येथे राज्यातील २५ मतदार संघामध्ये पाठवण्यात येणाऱ्या वाहनांची उभारणी करण्यात आली आहे. 

 

भाजपने हे अभियान अचानकच ठरवले असल्याचे समजते. यामुळे केवळ दोन दिवसांमध्येच २५ वाहनांची उभारणी करण्यासाठी सांगण्यात आले हाेते. यासाठी लहान मालवाहू टेम्पो भाड्याने घेण्यात आले आहेत. 

 

आचारसंहिता सुरू होण्याआधी वाहने गावांत : मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते. तोपर्यंत हे डिजिटल वाहन गावात जाऊन योजनांची माहिती पोहोचवणार आहेत. तसेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष पीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनांसंदर्भात अडचणींचा निपटाराही करून घेण्यात येणार आहे. 

 

अत्याधुनिक सुविधा 
वाहनांवर आधुनिक एलएडी स्क्रीन लावण्यात आला आहे. सर्व ऑनलाइन पद्धतीची यंत्रणा वाहनात उभी करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीनेच व्हिडिओ क्लिप दाखवली जाणार आहे. तसेच यावर खास व्हिडिओ संपर्कासाठी डायस देण्यात आले आहे. 

 

कमालीची गुप्तता 
भाजपला हे अभियान अचानक लाँच करायचे होते. यामुळे आतापर्यंत यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचे समजते. डिजिटल वाहने तयार करण्यासाठीही उस्मानाबादसारख्या दुर्लक्षित जिल्ह्याची निवड करण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...