आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Digvijaya Singh Appeals Shiv Sena, Ncp And Congress To Strength News And Updates

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने रस्त्यांवर उतरून आपली ताकद दाखवायला हवी -दिग्विजय सिंह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला -दिग्विजय
  • तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न

भोपाळ - शिवसेनेची मुंबईत काय ताकद आहे हे आज त्यांनी दाखवायला हवे. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने रस्त्यावर उतरायला हवे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिली. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी सकाळी अचानक सत्ता स्थापित केली. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांनी केलेल्या बंडखोरीने बनलेल्या महाराष्ट्र सरकार स्थापनेचा दिग्विजय यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ट्विट करत म्हणाले, "शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी रस्त्यांवर उतरायला हवे. पाहू मग, महाराष्ट्राची जनता कुणासोबत आहे. तिन्ही राजकीय पक्षांसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. प्रामुख्याने उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे." तर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, की हा भारतीय राज्यघटनेचा अपमान आहे. भाजपने जे गोवा, मेघालय आणि ठिकाणी केली तेच महाराष्ट्रात केले जात आहे. हा निर्णय अजित पवारांनी एकाकी घेतला. कुठलाही राष्ट्रवादीचा आमदार या सरकारला पाठिंबा देणार नाही असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.