आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट / 95 वर्षीय दिलीप कुमार यांना निमोनिया, रुग्णालयात करण्यात आले दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 95 वर्षीय दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना निमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. ही माहिती त्यांचे निकटवर्तीय फैसल फारुखी यांनी दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन दिली आहे. फैजल हे व्यवसायाने mouthshut.com चे सीईओ आणि अॅडव्होकेट आहेत.

 

Want to inform you @TheDilipKumar has been admitted to hospital last night. He's being treated for recurrent pneumonia. Praying...will keep you updated on twitter. --FF (@faisalMouthshut)

— Dilip Kumar (@TheDilipKumar) October 8, 2018

 

यापूर्वीही आले होते प्रकृती बिघडल्याचे वृत्त..

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आले होते. त्यावेळी मात्र फारुखी यांनी याचा इंकार करत ट्वीटर अकाउंटवरुन दिलीप कुमार ठीक असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले होते.  

 

प्रकृतीविषयी करण्यात येतोय हा दावा...
5 ऑक्टोबर रोजी एका एंटरटेन्मेंट वेबसाइटच्या रिपोर्टमध्ये दिलीप कुमार सध्या बोलू शकत नाहीत आणि कोणाला ओळखूही शकत नाहीत, असा दावा करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, काही काळापासून ते अशाच अवस्थेमध्ये आहेत. परंतु सायरा आपली संपूर्ण सेव्हिंग त्यांना वाचवण्यासाठी खर्च करत आहेत, असे सांगण्यात आले होते. मागील महिन्यात छातीमध्ये संक्रमण झाल्यामुळे दिलीपकुमार यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये 10 दिवस ऍडमिट करण्यात आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...