आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार/ फैजल यांनी फॅन्सला मागितले फॅन मोमेंट फोटोज, काही मिनिटात पोस्ट झाल्या शेकडो आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सोमवारी पुन्हा एकदा 95 वर्षीय दिलीप कुमार यांना निमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही माहिती त्यांच्या जवळचे फैजल फारुखी यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. याच काळात फैजलने अजून एक ट्वीट करत त्यांच्या चाहत्यांना साहेबांसोबतचे फोटोज शेअर करण्यास सांगितले. फैजल यांच्या या ट्विटनंतर काही मिनिटातच दिलीप कुमारच्या चाहत्यांनी शेकडो फोटो पोस्ट केले. 


यापुर्वी आली होती आजारी असल्याची अफवा 
काही दिवसांपुर्वी दिलीप कुमार यांची तब्येत खराब असल्याची अफवा समोर आली होती. परंतु फारुखी यांनी या गोष्टींचे खंडन केले होते. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले होते की, दिलीप कुमार ठिक आहेत आणि त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहेत. 

 

 

Want to inform you @TheDilipKumar has been admitted to hospital last night. He's being treated for recurrent pneumonia. Praying...will keep you updated on twitter. --FF (@faisalMouthshut)

— Dilip Kumar (@TheDilipKumar) October 8, 2018

Over the last 70+ years @TheDilipKumar Saab has enjoyed posing for photos and autographs for thousands of fans. If you or your relative have one such picture with Dilip Kumar Saab pls post it on twitter. We will retweet it -FF

— Dilip Kumar (@TheDilipKumar) October 8, 2018
फोटो क्लिक करण्याचा शौक 
फैजलने दिलीप कुमारांना फोटो काढण्याचा शौक असल्याचा उल्लेखही केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, गेल्या 70 वर्षांपेक्षा जास्त काळापासून दिलीप साहेबांना फोटो काढण्याचा शौक आहे. त्यांनी हजारो चाहत्यांना ऑटोग्राफही दिले आहेत. जर तुमच्या किंवा तुमच्या कुणी रिलेटिव्हसोबत त्यांचा फोटो असेल तर तो पोस्ट करा. आम्ही ते रिट्वीट करुन.  

 

 

बातम्या आणखी आहेत...