आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून घरी परतले दिलीप कुमार, नळीवाटे दिलं जातंय जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे गेल्या 14 दिवसांपासून दवाखाण्यात दाखल होते. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. फुफ्फुसातील जंतुसंसर्गामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांनामुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 5 सप्टेंबर रोजी त्यांना जास्त त्रास जाणवत असल्याने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. सध्या त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र ते पूर्णपणे बरे झालेले नाहीत. 'डिएनए'नं दिलेल्या वृत्तानुसार दिलीप कुमार यांना जेवण व औषधं ही नळीवाटे दिली जात आहेत.

 

दिलीप कुमार हे 95 वर्षांचे आहेत. छातीत दुखू लागल्याने 5 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज दिलं असून दिलीप कुमार यांचे निकटवर्तीय फैसल फारूखी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. ‘तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि सदिच्छांबद्दल खूप खूप आभार. दिलीप कुमार यांची प्रकृती आता सुधारत असून ते घरी आहेत,’ असं फारूखी यांनी ट्विट केलं.

बातम्या आणखी आहेत...