आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Dilip Kumar's Brother's Wife Begum Para Was Famous As A 'bombshell' Of Bollywood

दिलीप कुमारच्या भावाची पत्नी बॉलिवूडची 'बॉम्बशेल' म्हणून होती प्रसिद्ध, 50च्या दशकात केले होते बोल्ड फोटोशूट

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः आजच्या काळातील अभिनेत्री बिनधास्तपणे बोल्ड फोटोशूट करत असतात. जवळजवळ सर्वच प्रसिद्ध मॅगझिन्स अभिनेत्रींचे बोल्ड फोटोशूट कव्हरपेजवर प्रकाशित करुन चर्चा एकवटत असतात. मात्र 1951 मध्येसुद्धा काही अभिनेत्रींनी बोल्ड फोटोशूट करायचे धाडस दाखवले होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? त्याकाळात अभिनेत्री सिनेमांमध्ये अभिनय करायला घाबरायच्या. सिनेमात झळकल्या तर त्या साडीत किंवा सलवार सूटमध्येच दिसायच्या. मात्र त्याकाळातील एका अभिनेत्रीने बोल्ड पाऊल उचलून सर्वांना अचंबित केले होते. या अभिनेत्रीचे नाव होते बेगम पारा. त्यांचा आज स्मृतीदिन आहे. 9 डिसेंबर 2008 रोजी त्या हे जग सोडून कायमच्या निघून गेल्या. एक नजर टाकुया बेगम पारा यांच्या प्रवासावर...

 • 1951 मध्ये केले होते बोल्ड फोटोशूट...

बेगम पारा यांनी लाइफ मॅगझिनसाठी एक ग्लॅमरस फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये त्यांनी व्हाइट साडी परिधान करुन सिगारेटचा झुरका लावताना पोज दिल्या होत्या. बॉलिवूडमधील 'पहिली बॉम्बशेल' आणि 'पिन अप गर्ल' नावाने त्या प्रसिद्ध होत्या. बेगम पारा यांचे हे फोटोशूट त्याकाळातील प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बुर्के यांनी केले होते. 

 • कोण होत्या बेगम पारा?

बेगम पारा 1940-50च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री होत्या. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1944मध्ये रिलीज झालेल्या 'चांद' या सिनेमात त्या प्रेम आदिबसोबत झळकल्या होत्या. 'सोहनी महिवाल' (1946), 'जंजीर' (1947), 'मेहंदी' (1947) या सिनेमात बेगम पारा नर्गिससोबत दिसल्या होत्या. 'नील कमल' (1947) मध्ये त्यांनी राजकपूर आणि मधुबाला यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय 'लैला मजनूं' (1953), 'नया घर' (1953) आणि 'पहली झलक' (1955) या सिनेमातदेखील त्यांनी काम केले होते.

 • असे होते खासगी आयुष्य...

बेगम पारा यांचा जन्म 25 डिसेंबर 1926 रोजी झेलम, पंजाब (आता पाकिस्तान) येथे झाला होता. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बेगम पारा यांना एकुण दहा बहीणभावंड होती. पारा यांचे बालपण बिकानेर (राजस्थान)मध्ये गेले. तेथे त्यांचे वडील मियां एहसान उल हक चीफ जस्टिस होते. त्यांचे नाव केवळ पारा होते. मात्र सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी आपल्या नावासमोर बेगम हा शब्द जोडला.

 • दिलीप कुमारच्या धाकट्या भावासोबत केला होता निकाह...

फिल्मी दुनियेत स्थिरावल्यानंतर त्यांनी 1956 मध्ये दिलीप कुमार यांचे बंधू नासिर खान यांच्यासोबत लग्न केले होते. बेगम पारांसोबत लग्न करण्यासाठी नासिर खान यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. पहिल्या पत्नीपासून नासिर यांना एक मुलगी होती. बेगम पारा यांच्यासोबत दुसरे लग्न केल्यानंतर त्या मुलीची संपूर्ण जबाबदारी बेगम पारा यांनी स्वीकारली होती. नासिर खान आणि बेगम पारा यांच्या लग्नाला दिलीप कुमार यांनी उपस्थिती लावली नव्हती. बेगम पारा आणि नासिर खान यांना तीन मुले आहेत.

 • मुलगा आहे अभिनेता..

बेगम पारा आणि नासिर खान यांचा मुलगा अयुब खान हा बॉलिवूड अभिनेता आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील तो प्रसिद्ध चेहरा आहे. वयाच्या 49 व्या वर्षी अयुब खानचे वडील नासिर खान यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर बेगम पारा यांनी तिन्ही मुलांचे संगोपन केले.

 • वयाच्या 81 व्या वर्षी झाले बेगम पारा यांचे निधन...

संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' या सिनेमात बेगम पारा शेवटच्या झळकल्या होत्या. 2007 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात त्यांनी सोनम कपूरच्या आजीची भूमिका वठवली होती. 2008मध्ये बेगम पारा यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या 81 वर्षांच्या होत्या.

 • 2007 मध्ये दिली होती अखेरची मुलाखत...
 • पारा यांनी या मुलाखतीत आपल्या सिनेसृष्टीतील पदार्पणावर प्रकाशझोत टाकताना म्हटले होते, "मी नेहमी सुटीत मुंबईत येत होते. येथे माझ्या वहिनी प्रोमिता दासगुप्ता वास्तव्याला होत्या. त्यांनी 'कोर्ट डान्सर' या सिनेमा अभिनय केला होता. त्यावेळी अनेकांचे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. तेव्हा काही निर्माते आणि दिग्दर्शकांची नजर माझ्यावर पडली. त्यांनी मला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. प्रोतिमा यांनीही मला सिनेमांच्या ऑफर्स स्वीकारण्याचा सल्ला दिला. यासंदर्भात मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली, मात्र ते माझ्या या निर्णयाने आनंदी नव्हते. ब-याच प्रयत्नानंतर प्रोतिमा आणि मी कुटुंबीयांचा होकार मिळवला. त्यानंतर माझा फिल्मी प्रवास सुरु झाला. वयाच्या 17 व्या वर्षी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. 'चांद' या सिनेमात प्रेम अदीब माझे हीरो होते. सिनेमाचे शूटिंग पुण्याच्या प्रभात स्टुडिओत झाले होते. त्यावेळी मी बरीच नर्व्हस आणि उत्साहित होते. मी उत्तमरित्या पहिला शॉट दिला. त्यावेळी सर्वांनी मला मदत केली होती."
 • सिनेमात लव्ह मेकिंग सीन द्यावा लागला होता का? या प्रश्नाचे उत्तर देताना बेगम पारा म्हणाल्या होत्या, " होय... आदिब आणि मी एकमेकांच्या डोळ्यांत आकंठ बुडून गाणे गायले होते. तो काळ खूप वेगळा होता."
 • आपल्या बोल्ड इमेजविषयी पारा म्हणाल्या होत्या, "सिनेमात मी इमोशनल आणि फॅशनेबल अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका वठवल्या. बोल्ड इमेज त्याकाळात खूप मोठी गोष्ट होती. पँट्स, जीन्स आणि अनक्वेंशनल ड्रेसेस मी परिधान करायचे. त्यामुळे प्रत्येक मॅगझिनवर माझी छायाचित्रे प्रकाशित व्हायची. माझी फिगर उत्तम होती. त्यामुळे अनेक मॅगझिन्स मला बोल्ड पोज द्यायला सांगायचे. त्यावर मी कधीही आक्षेप नोंदवला नाही."

बातम्या आणखी आहेत...