आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलजीत दोसांझने शेअर केला इवांका ट्रम्पसोबतचा फोटोशॉप्ड फोटो, उत्तर मिळाले - धन्यवाद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारताचा 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम अनेक प्रकारे चर्चेत राहिला. दौऱ्यामध्ये ट्रम्प यांच्यासोबत त्यांची मुलगी इवांका ट्रम्पदेखील आली होती. त्यांनी आग्र्याचा ताजमहलदेखील पाहिला होता. ताजसमोरचा फोटोदेखील व्हायरल झाला. यावर अनेक मीम्सदेखील बनले. असेच एक मीम अभिनेता - गायक दिलजीत दोसांझने रविवारी शेअर केले. 

त्याने एका फॅनने बनवलेला आपला फोटोशॉप्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. यामध्ये तो अमेरिकेचे राष्ट्रपती डॉनल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पसोबत ताजमहलसमोर क्रॉस लेग पोजीशनमध्ये बसलेला दिसत आहे. फोटोवर दिलजीतने कॅप्शन लिहिले, "मी आणि इवांका. मागेच लागली होती. म्हणत होती ताजमहलला यायचंय, ताजमहल पाहायचाय, मग काय करावे घेऊन गेलो.’

वायरल होत असलेल्या या फोटोवर संध्याकाळी इवांकाचे उत्तरदेखील आले. इवांकाने ट्विटरवर लिहिले, ‘धन्यवाद मला हा सुंदर ताजमहल दाखवायला घेऊन जाण्यासाठी, हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही.' याव्यतिरिक्त तिच्या व्हायरल होत असलेल्या इतर फोटोंवरही इवांकाने प्रतिक्रिया दिली. दिलजीत दोसांझलाही एका यूजरने लिहिले, 'यू आर लेट पाजी. यावरदेखील इवांकाने लिहिले, ‘मी भारतीयांच्या भारतीयों की आपलेपणाचे कौतुक करते. मी अनेक नवे मित्र बनवले आहेत.' यावर अनेक यूजर्स कमेंट आणि शेअर करत आहेत.