डिंड्रा डाॅटिन टी-20 / डिंड्रा डाॅटिन टी-20 वर्ल्डकपमध्ये शतक अाणि पाच विकेट घेणारी पहिली महिला

वृत्तसंस्था

Nov 11,2018 09:58:00 AM IST

गयाना - गत चॅम्पियन वेस्ट इंडीज संघाने अापल्या घरच्या मैदानावर अाता किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यजमान विंडीज संघाने महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या अापल्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला धूळ चारली. सामनावीर डिंड्रा डाॅटिनच्या (५/५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर विंडीजने १४.४ षटकांत ६० धावांनी विजयाची नाेंद केली. यासह विंडीजला स्पर्धेत धडाकेबाज विजय संपादन करता अाला. अाता विंडीजचा दुसरा सामना १४ नाेव्हेंबर राेजी द. अाफ्रिकेशी हाेईल.


विंडीजची २७ वर्षीय डाॅटिन ही वर्ल्डकपमध्ये शतक झळकावणारी अाणि पाच विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. तिने अाता बांगलादेशविरुद्ध पाच विकेट घेतल्या. तिची ही कामगिरी अव्वल ठरली. तसेच २०१० च्या विश्वचषकात शतक झळकावले हाेते. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने ८ बाद १०६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला अवघ्या ४६ धावांवर गुंडाळण्याचा पराक्रम विंडीजच्या गाेलंदाजांनी गाजवला. बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला धावांचा दुहेरी अाकडा पार करता अाला नाही. फर्गानाने सर्वाधिक ८ धावांची खेळी केली.

अाॅस्ट्रेलियाचा पाकवर सलग १० वा विजय

अाॅस्ट्रेलियन महिला संघाने विश्वचषकात शानदार विजयी सलामी दिली. या संघाने सलामीला पाकिस्तानच्या महिलांना पराभूत केले.अाॅस्ट्रेलियाने ५२ धावांनी मात केली. अाॅस्ट्रेलियन महिलांनी लय कायम ठेवताना पाकवर सलग १० व्या विजयाची नाेंद केली. पाकच्या टीमला अातापर्यंत एकदाही बलाढ्य अाॅस्ट्रेलियाविरुद्ध विजय संपादन करता अाला नाही. प्रथम फलंदाजी करताना अाॅस्ट्रेलियाने पाकवरसमाेर विजयासाठी १६६ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात पाकच्या महिलांनी ८ गड्यांच्या माेबदल्यात ११३ धावांपर्यंत मजल मारली. पाकच्या बिस्माह मारूफने सर्वाधिक २६ अाणि सना मीरने २० धावा काढल्या. अाॅस्ट्रेलियाच्या मेगन व जाॅर्जियाने प्रत्येकी दाेन बळी घेतले.

भारतीय महिला अाता पाकविरुद्ध सलग चाैथ्या विजयासाठी सज्ज

भारत-पाक अाज सामना रंगणार; प्रक्षेपण रात्री ८.३० वाजेपासून
सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय महिला संघ अाता अायसीसीच्या महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला. याशिवाय भारतीय महिलांची नजर अाता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सलग चाैथा विजय संपादन करण्याकडे लागली अाहे. भारताने गत दाेन वर्षात या पाकविरुद्ध झालेल्या तिन्ही सामन्यात विजयी पताका फडकवली अाहे. त्यामुळे अाता हाच दबदबा कायम ठेवताना विजयी चाैकारासाठी भारतीय महिला उत्सुक अाहेत. पाकच्या महिला संघाने २०१६ च्या विश्वचषकात भारतावर शेवटचा विजय संपादन केला हाेता.

X
COMMENT