आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : बिग बॉस 12 फेम 24 वर्षांचा दीपक ठाकुर बिहारच्या मुजफ्फरपुरमधील आथर या छोटयाशा गावातील आहे. बीबीए ग्रेजुएट दीपकला दीपिका आणि ज्योति या दोन छोट्या बहिणी आहेत. दीपकचे पिता पंकज ठाकुर शेतकरी आहेत आणि आई मीरा स्वास्थ्य विभागात काम करते. रविवारी फायनलमध्ये विनरची घोषणा होण्याआधी 20 लाख रुपये घेऊन शो क्विट करणाऱ्या दीपकने सर्वात आधी तो त्या पैशांनी काय करणार आहे. तो म्हणाल, या पैशांनी माझ्या बहिणींचे धूम धडाक्यात लग्न करणार आहे.
उसने पैसे घेऊन दिले होते ऑडिशन...
- शोच्या फिनालेमध्ये दीपकच्या वडीलांनी सांगितले की, मी 3 हजार रुपये उसने घेऊन त्याला दिल्ली ऑडिशनसाठी पाठवले होते.
- आज माझ्या मुलामुळे मुजफ्फरपुरचे कलेक्टर आणि मोठे ऑफिसर पण मला ओळखतात.
- ते म्हणाले, जा प्रत्येक गावात दीपकसारखे पाच मुले जरी असले तरी देशाची हालत सुधारेल.
एका फोनने बदलले नशीब...
- दीपकने सांगितले की, फेमस डायरेक्टर अनुरागच्या एका फोन त्याचे आयुष्य बदलले. त्यावेळी 3 मिनिटे 48 सेकंदाच्या बोलण्यातच तो खूप भावुक झाला होता.
- अनुरागने त्याला 'गँग्स ऑफ वासेपुर' मध्ये गाण्याची संधी दिली होती. मात्र, या इतक्या मोठ्या ब्रेकनंतरही 7 वर्ष दीपक बेरोजगार होता.
काय आहे क्वालीफिकेशन ?
- 2017 मध्ये बिहारमध्ये आलेल्या पुरामुळे दीपकच्या कुटुंबाचे खूप नुकसान झाले. यामुळे त्यांना त्यांचे पिढीजात घर सोडावे लागले. पूर्ण कुटुंब मुजफ्फरपुरमध्ये भाड्याने राहू लागले.
- दीपकने मुजफ्फरपुरच्या ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूलमध्ये 10 पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर एलपी शाही कॉलेज, मुजफ्फरपुरहुन 12th केल्यानंतर एलएन मिश्रा कॉलेज ऑफ बिजनेस मैनेजमेंटमधून त्याने BBA केले.
- कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पुरेशी नसल्यामुळे त्याला MBA करता आले नाही. त्यानंतर दीपक म्यूजिकवर फोकस करू लागला. त्याने डॉक्टर संजय कुमार संजू यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.