आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्सेस स्टोरी : वडील बालपणीच सोडून गेले, आईजवळ भाड्याचे पैसे द्यायलाही नव्हते पैसे, टॅलेंटच्या बळावर 10 वर्षांच्या चिमुकलीने बदलले नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' सीजन 3 ची विजेती ठरली आहे पुण्याची दीपाली बोरकर. दीपिकाने सर्व स्पर्धकांना मागे टाकत ट्रॉफी आपल्या नावी केली आहे. इतकेच नाही तर दीपिकाला या शोच्या माध्यमातून स्वतःचे आणि कुटुंबीयांचे नशीब बदलण्याची संधी मिळाली आहे. 10 वर्षांची दीपाली शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक होती. तिने आपल्या सादरीकरणाने केवळ प्रेक्षकांचे नव्हे तर परिक्षकांचेही मन जिंकले. याच कारणामुळे दिग्दर्शक आणि जज ओमंग कुमार यांनी दीपालीला त्यांच्या चित्रपटासाठी साइन केले आहे. दीपालीसह ओमंग यांनी स्पर्धक एंजलिका आणि रामू श्रीनिवास यांनाही चित्रपटात संधी दिली आहे. दीपालीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची असून ती तिच्या आई आणि बहिणीसोबत भाड्याच्या घरात राहते. 


वडील सोडून गेले आहेत घर...
दीपालीचे वडील आर्थिक जबाबदारीकडे पाठ फिरवत कुटुंबीयांना सोडून निघून गेले आहेत. दीपालीच्या आईने दोन्ही मुलींना मोठे केले आहे. पण आता दीपालीला आर्थिक मदत मिळाली आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दीपालीच्या शिक्षणाचा खर्च पेलू शकत नसल्याचे तिच्या आईने शोमध्ये सांगितले होते. दीपालीचे टॅलेंट बघून दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी तिला त्यांच्या चित्रपटासाठी साइन केले आणि सायनिंग अमाउंटही दिली. सोबतच वर्षभराचे घराचे भाडेही देण्याचे वचन दिले.

 

विशाल भारद्वाज देणार दीपालीला चित्रपटात संधी..
बातम्यांनुसार, दिग्दर्शक विशाल भारद्वाज दीपालीचे अभिनय कौशल्य बघून प्रभावित झाले आहेत. त्यांनी सांगितले की, भविष्यात त्यांना चित्रपटात बालकलाकाराची गरज भासल्यास ते दीपालीला कास्ट करतील.

 

हीरोइन व्हायचे आहे स्वप्न...

Divyamarathi.com सोबत बोलताना दीपाली म्हणाली, 'एवढ्या मोठ्या लोकांकडून कौतूक होत असल्याने मी अतिशय आनंदी आहे. हीरोइन व्हायचे माझे स्वप्न आहे. आता माझे हे स्वप्न पूर्ण होईल, अशा आशा मला आता दिसत आहेत. मला माहित नाही माझ्या नशीबात पुढे काय असेल. पण ज्या गोष्टी घडत आहेत, त्या अतिशय सकारात्मक आहेत.' दीपाली तिच्या घरात एकमेव कमावती व्यक्ती आहे. 

बातम्या आणखी आहेत...