आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपाली सय्यदचा शिवसेनेत प्रवेश; मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गुरूवारी रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा शिवसेना प्रवेश झाला. रश्मी ठाकरे यांनी दीपाली यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. या प्रवेशासोबतच दीपाली यांना आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 
 

मुंब्र्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता 
दीपाली सय्यदच्या शिवसेना प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान दीपालीला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कळवा मुंब्र्यातून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग दोन वेळा येथून निवडूण आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. 

दीपाली सय्यद या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. जत्रा, ढोलकीच्या तालावर, उचला रे उचला, लाडीगोडी, मुंबईचा डबेवाला, करायला गेलो एक, मास्तर एके मास्तर या आणि अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तर बंदिनी, दुर्वा या मालिकांमधूनही त्यांनी काम केले आहे. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी आम आदमी पार्टीच्या तिकिटावर त्यांनी अहमदनगरमधून निवडणूक लढवली होती.