आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका कक्करने रात्री उशिरा दिली पती शोएबला सरप्राइज पार्टी, तापाने फणफणत असूनही केली सर्व तयारी, स्वयंपाक कारण्यापासून ते एक एक वस्तू स्वतः केली डेकोरेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बिग बॉस-12 ची विनर दीपिका कक्कर आपल्या नवीन व्हिडिओसाठी चर्चेत आहे. हा व्हिडीओ दीपका आणि तिचा अॅक्टर पती शोएब इब्राहिमचा आहे. दीपिकाने रात्री उशिरा पती शोएबसाठी सरप्राइज पार्टी प्लॅन केली होती. शोएबची फिल्म 'बटालियन 609' साठी दीपिकाने चीयर पार्टी होस्ट केली होती, ज्यामध्ये शोएबने आपली फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत केक कापला. दीपिकाला कडक ताप असूनही तिने नवऱ्यासाठी सर्व तयारी केली. दीपिकाची नणंद सबा इब्राहिमने सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेयर करून लिहिले, " वहिनींकडून दादासाठी स्मॉल अँड क्यूट सरप्राइज पार्टी. फीवर असूनही सर्व तयारी करणे, स्वयंपाकही स्वतः केला. हे सर्व तुम्हीच करू शकता वहिनी". दीपिका टीव्ही सीरियल ‘ससुराल सिमर का’ ची लीड अॅक्ट्रेस होती. दीपिकाने 22 फेब्रुवारी 2018 मध्ये आपला को-स्टार शोएब इब्राहिमसोबत निकाह केला होता. लग्नासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. दीपिका डान्स रियलटी शो ‘नच बलिए’ मध्येही दिसली आहे. या शोमध्ये तिचा पार्टनर शोएबच होता. दीपिकाचे हे दुसरे लग्न आहे. दीपिकाने रोनक मेहतासोबत 2013 मध्ये पहिले लग्न केले होते. पण 2 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...