Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | diploma in X-Ray radioography courses first time in Vidarbha

विदर्भात पहिल्यांदाच डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी' अभ्यासक्रम

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:22 AM IST

- राज्यात कोकणातील रत्नागिरी येथील कर्करोग निदान रूग्णालयानंतर विदर्भात प्रथमच "अॅडव्हाॅन्स्ड डिप्लोमा इन रेडिओग्राफी

  • diploma in X-Ray radioography courses first time in Vidarbha

    नागपूर- राज्यात कोकणातील रत्नागिरी येथील कर्करोग निदान रूग्णालयानंतर विदर्भात प्रथमच "अॅडव्हाॅन्स्ड डिप्लोमा इन रेडिओग्राफी अॅण्ड अल्ट्रा सोनोग्राफी टेक्निक' अभ्यासक्रम रातुम प्रादेशिक कर्करोग निदान, संशोधन केंद्रामध्ये सुरू करण्यात आला असून विद्यार्थ्यांना येत्या ८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घ्यायचे आहे.

    दीड वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी बीएसस्सी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, लाइफ सायंस, झुआॅलाॅजी, बायोकेमिस्ट्री आदी विषयात बीएसस्सी केलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. रुग्णालयाचे संचालक डाॅ. सब्रजित दासगुप्ता व उपसंचालक डाॅ. बी. के.शर्मा यांनी रत्नागिरीनंतर राज्यातील हा दुसराच अभ्यासक्रम असल्याचे सांगितले. रोजगाराच्या दृष्टीनेही विद्यार्थ्यांसाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम असल्याचे ते म्हणाले. माहिती पुस्तिका रुग्णालयात उपलब्ध असून अर्ज विद्यार्थ्यांना ऑफलाइन भरायचे आहे.

Trending