आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी नवीन सुविधा, या ठिकाणावरून थेट AC बस सेवा सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता उत्तर प्रदेशवरून वैष्णोदेवी जाणे खुप सोपे झाले आहे. यूपी सरकारने वैष्णोदेवी दर्शन भक्तांसाठी ही खास भेट आणली आहे. आता लखनऊ आणि प्रयागराजवरून कटरापर्यंत थेट बस सेवा सुरू केली आहे. 
 

या वेळेला असेल बस
लखनऊवरून कटराला जाणारी पहिली बस 1 वाजता निघेल. त्यानंर दोन बस रात्री 10 आणि 10.30 ला निघतील. प्रयागराजवरून कटरासाठी एकच बस असेल ती सकाळी 8 ला असेल.


हा आहे टाइम-टेबल
प्रयागराजवरून कटरा जाणारी बस सकाळी 8:00 वाजता असेल आणि ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:45 वाजता कटराला पोहचेल. कटरावरून प्रयागराजसाठी रात्री 8 वाजता बस असेल. लखनऊवरून कटरा दुपारी 1 वाजता असेल ती, रात्री 11 ला पोहचेल. कटरावरून लखनऊसाठी बस रात्री 9 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 ला पोहचेल. 

 

इतके असेल भाडे
लखनऊ ते कटरा व्हाया आग्रा-मथुरा-नवी दिल्ली 1197 रूपये

प्रयागराज ते कटरा व्हाया लखनऊ-कश्मीरी गेट 1333 रूपये

लखनऊ ते कटरा व्हाया सहारनपूर-जालंधर-पठानकोट 1103 रूपये

लखनऊ ते कटरा व्हाया मुजफ्फरनगर-हरिद्वार-सहारनपूर 1127 रूपये

बातम्या आणखी आहेत...