आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Direct Transfer Of 6000 Rupees Is Better Than Farmer Loan Waive Off, Claims Ex Rbi Governer

शेतकरी कर्जमाफीपेक्षा चांगली आहे 'न्याय' योजना, मोदींना यासंदर्भात बोललो होतो; रघुराम राजन यांचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर असताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एक प्लॅन दिला होता. न्याय असे या योजनेचे नाव होते आणि ती योजना शेतकरी कर्जमाफीपेक्षा चांगली होती. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यापेक्षा त्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये देणे आणि त्यांना आधुनिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे चांगला पर्याय होता. रघुराम राजन यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा गौप्यस्फोट केला. सध्या ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

 

काँग्रेसला दिला होता हा सल्ला
आरबीआयचे माजी गव्हर्नर राजन म्हणाले, की त्यांनी काँग्रेसला सुद्धा 'न्याय' ही योजना घोषित करण्याचा सल्ला दिला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशाच स्वरुपाची योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास गरीबांना दरवर्षी 72 हजार अर्थात दरमहा 6 हजार रुपये थेट बँक खात्यात देणार असा दावा राहुल यांनी केला. अशात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे शेतकऱ्यांची मदत करण्याचा चांगला पर्याय आहे असे राजन म्हणाले.


विकासाच्या बाबतीत कुठल्याही राजकीय पक्षाची मदत करण्यास तयार
विशेष म्हणजे, अर्थकारणाच्या बाबतीत आपण कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला सल्ला देण्यास तयार आहोत. देशाच्या विकासात कशा पद्धतीने मदत करता येईल हे पाहणे महत्वाचे आहे. याच दृष्टीकोनातून काँग्रेसने ज्या योजनेची घोषणा केली. ती अंमलात आणण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यापासून ते तांत्रिक आणि आर्थिक सल्लामसलत अशा सर्वच स्वरुपाची मदत करण्यास आपण तयार आहोत असेही ते पुढे म्हणाले. अर्थतज्ज्ञ राजन सध्या आपले नवीन पुस्तक 'द थर्ड पिलरः हाऊ मार्केट्स अॅण्ड स्टेट लीव द कम्यूनिटी बीहाइंड' च्या प्रचारासाठी भारत दौऱ्यावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...